पुणे : पुण्यात हत्या (Murder) झालेल्या रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भावनिक ईमेल पाठवत मुलाच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवून देण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. (Ketan Agrawal Murder)
पत्रात राखी अग्रवाल यांनी आपल्या वेदना व्यक्त करत, एक दिवस स्वतःच्या मुलासाठी न्याय मागण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहावं लागेल, अशी कल्पनाही कधी केली नव्हती, असे म्हटले आहे. “प्रत्येक आईप्रमाणे मी केतनचं उज्ज्वल भविष्य, त्याचं लग्न आणि आमच्यासोबतचं आयुष्य पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण त्याऐवजी मला माझ्याच मुलावर अंत्यसंस्कार करावे लागले,” अशी हळवी भावना त्यांनी व्यक्त केली. (Pune Crime News)
मुंबई: राज्यात मागील काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून बाजारात आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली ...
केतनची हत्या अत्यंत क्रूर असल्याचे सांगत, त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. “केतन गेला, त्या दिवशी माझं जगच संपलं. घरातील प्रत्येक कोपरा, त्याची खोली, कपडे आणि फोटो आजही त्याची आठवण करून देतात,” असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. (Justice For Ketan Agrawal)
राखी अग्रवाल यांनी पत्रात केतनच्या आजोबांचाही उल्लेख केला. नातवाच्या हत्येचा धक्का सहन न झाल्याने त्यांचे एका महिन्याच्या आत निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे काही आठवड्यांतच कुटुंबावर दोन पिढ्यांचा शोक ओढवला, असे त्यांनी नमूद केले. (Crime)
- ठाणे-पनवेलसह 'या' शहरांचा समावेश मुंबई : स्वतःच्या हक्काच्या घराची वाट पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण ...
“मी सहानुभूती किंवा कोणतीही विशेष सवलत मागत नाही. मला फक्त न्याय हवा आहे. कृपया केतनला केवळ आणखी एक प्रकरण म्हणून पाहू नका. तो कोणाचा तरी मुलगा, नातू आणि भाऊ होता; पण माझ्यासाठी तोच माझं सर्वस्व होता,” असे भावनिक आवाहन त्यांनी पंतप्रधानांकडे केले आहे. (Murder)
यापूर्वी केतन अग्रवाल यांच्या वडिलांनीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली होती. दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलीस (Pune Police) तपास सुरू असून सर्व संबंधित बाबींचा सखोल तपास केला जात आहे.





