Tuesday, July 14, 2026

BBL Schedule :ऑस्ट्रेलियाच्या BBL स्पर्धेचे वेळेपत्रक जाहीर; भारतात होणार पहिला सामना ! कुठे आणि कधी जाणून घ्या ?

BBL Schedule :ऑस्ट्रेलियाच्या BBL स्पर्धेचे वेळेपत्रक जाहीर; भारतात होणार पहिला सामना ! कुठे आणि कधी जाणून घ्या ?

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅस लिगचा १६ वा सीजन लवकरच सुरु होणार आहे. बीबीएलकडून आज (१४ जुलै) रोजी आगामी २०२६-२०२७ चे वेळेपत्रक जाहीर करण्यात आले आहे. या हंगामाचे वैशिष्ट्य म्हणजे, यंदाच्या हंगामाचा पहिला सामना भारतात होणार आहे.काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी घोषणा केली होती, की यंदाच्या बिग बॅस लिगचा पहिला सामना भारातातील चेन्नईच्या ऐतिहासिक एम.ए चिंदबरम स्टेडियम (चेपॉक) येथे १२ डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. (BBL 2026)

१२ डिसेंबरला पहिला सामना

बिग बॅश लीग २०२६-२०२७ ची सुरुवात १२ डिसेंबरपासून होणार आहे. यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना भारतातील प्रसिद्ध चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स आणि पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात लढत होणार आहे. या ऐतिहासिक सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स संघाला होम टीमचा दर्जा देण्यात आला आहे. भारतात पहिल्यांदाच बीबीएलचा सामना आयोजित करण्यात आल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Chennai)

 
View this post on Instagram
 

A post shared by KFC Big Bash League (@bbl)

मेलबर्नमधून नरेंद्र मोदींची घोषणा

काही दिवसांपूर्वी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्याच्या अखेरीस, मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, माजी कर्णधार स्टीव्ह वॉ आणि माजी महिला क्रिकेटपटू लिसा स्टॅसेकर यांच्या उपस्थितीत, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मजबूत क्रिकेट संबंधांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या बीबीएल सामन्याचे स्वागत केले. (Narendra Modi)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >