Nitesh Rane : प्रशासकीय गतिमानतेत मंत्री नितेश राणेंच्या खात्याचा पहिला क्रमांक

 मत्स्यव्यवसाय विभागाच्या उपक्रमांना राज्यस्तरीय ‘प्रगती’ पुरस्कार; ‘ड्रोन’ गस्त आणि कृत्रिम भित्तिका प्रकल्प ठरले अव्वल


मुंबई : राज्याच्या सागरी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कृत्रिम भित्तिकांच्या माध्यमातून मत्स्यसंपदेचे संवर्धन करणाऱ्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या दोन महत्त्वाकांक्षी उपक्रमांनी राज्य सरकारचा मानाचा ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२५-२६’ पुरस्कार पटकावला आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांतून राबविण्यात आलेल्या ‘ड्रोन आधारित देखरेख’ यंत्रणेला प्रथम, तर क्षेत्रीय कार्यालयांच्या श्रेणीत ‘शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास’ उपक्रमाला अव्वल स्थान मिळाले आहे.



राज्यातील किनारपट्टीवर होणारी अवैध मासेमारी आणि घुसखोरी रोखण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने जानेवारी २०२५ पासून ड्रोन गस्त सुरू करण्यात आली होती. या प्रणालीमुळे अरबी समुद्रातील हालचालींवर नियंत्रण मिळवणे सुलभ झाले आहे. विशेषतः एलईडी दिव्यांचा वापर करून केली जाणारी बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी रोखण्यात या तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली आहे. या यशामुळे मत्स्यव्यवसाय विभागाची प्रशासकीय गतिमानता सिद्ध झाली असून, त्याला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे.



‘शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास व मत्स्यसंपदेचे संरक्षण’ या उपक्रमांतर्गत अरबी समुद्र किनारपट्टीवरील १८२ गावांमध्ये कृत्रिम भित्तिका उभारण्यात आल्या आहेत. या भित्तिकांमुळे माशांसाठी सुरक्षित प्रजनन अधिवास निर्माण झाला असून, ५० मीटरचे संरक्षण क्षेत्र विकसित झाले आहे. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम मत्स्योत्पादनावर झाला असून, उत्पादनात तब्बल २९ हजार किलोची वाढ नोंदवली गेली आहे.



पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ


या कृत्रिम भित्तिकांच्या देखभालीसाठी स्थानिक मच्छीमार सहकारी संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय, समुद्रातील प्लास्टिक कचरा आणि ‘घोस्ट नेट’ संकलनावरही भर देण्यात आला आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली असून सागरी पर्यावरणाचे रक्षण झाले आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाने ड्रोन तंत्रज्ञान आणि डिजिटल डेटा मेंटनन्समध्ये केलेले काम कौतुकास्पद आहे. या यशामुळे मच्छीमार बांधवांची आर्थिक उन्नती आणि सागरी सुरक्षेला बळ मिळाले आहे. या यशाचे श्रेय विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मच्छीमार बांधवांचे आहे. - नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा