Monday, April 20, 2026

BMC News : ऐतिहासिक महापालिका सभागृहात नगरसेवकांचे चर्वाणचर्व

BMC News : ऐतिहासिक महापालिका सभागृहात नगरसेवकांचे चर्वाणचर्व

कडक शिस्तीच्या महापौर कधी नगरसेवकांना लावणार शिस्त?

मुंबई : मुंबई महापालिकेचे सभागृह हे ऐतिहासिक मानले जात असून या ऐतिहासिक सभागृहात निवडून जाण्याचे प्रत्येक राजकीय व्यक्तींचे स्वप्न असते. परंतु या ऐतिहासिक वास्तू निवडून आलेल्य नगरसेवकांकडून या वास्तूचे पावित्र्य राखले जात नसून जिथे तासनतास सभागृहात बसून प्रत्येक कामकाजाचा अनुभव घेतला, तिथे सध्या निवडून आलेले नगरसेवक हे केवळ टाईमपास म्हणून सभागहात बसताना दिसत आहे. या ऐतिहासिक सभागृहामध्ये काही नगरसेवक हे केवळ आणि केवळ आपापसांत गप्पा मारणे आणि खाण्याशिवाय काही करताना दिसत नाही. परंतु कडक शिस्तीच्या पिठासीन अधिकारी असलेल्या महापौरांच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार चालत असतानाही त्यांच्या डोळ्याची जरब आणि शिस्तीचा बडगा कधी दिसून येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये सध्या नगरसेवकांसाठी तसेच पत्रकार आणि अधिकाऱ्यांसाठी बसवण्याकरता जागा अपुरी असल्यामुळे आधीच महापालिका सभागृह चर्चेत आले आहे. त्यातच सभागृहात नगरसेवकांचा आवाज योग्यप्रकारे येत नसल्याने यासाठीची ध्वनी मुद्रण यंत्रणेतील दोष आणि त्याचे निवारण याबाबतही हे सभागृह चर्चेत आले आहे. परंतु आता या सभागृह पुन्हा एकदा चर्चेत येत आहे ते नगरसेवकांकडून सभागृहात नियमांचे न होणारे पालन. महापालिकेच्या सभागृहातील नियमांनुसार सभागृहामध्ये कोणत्याही सदस्याला पाण्याची बॉटल नेण्यास बंदी आहे. तरीही पहिल्या सभेत सांगूनही काही सदस्य पाण्याची बॉटल्स खुलेआम आणून ते पाणी पिताना दिसत आहे. मात्र, या पाण्याच्या बॉटल्स नगरसेवकांच्या हाती तसेच त्यांच्या टेबलवर दिसूनही कोणत्याही प्रकारे त्याला प्रतिबंध केला जात नाही. त्यातच आता मागील काही दिवसांपासून नियमित कामकाजांसह अर्थसंकल्पीय चर्चेसाठी भरलेल्या सभागृहांमध्ये नगरसेवकांचे चर्वाणचर्व खुलेआम सुरु झाले आहे. यापूर्वीही सभागृहात नगरसेवकांकडून केवळ चॉकलेट लपून खाल्ले जायचे,परंतु ते खाताना त्यांचे प्रदर्शन केले जात नसे. पण आता दोन्ही बाजुचे नगरसेवक सुकामेवा तसेच चणे, शेंगदाणे हे खुले आम हाती घेवून एखाद्या कट्टयावर बसून खावे अशाप्रकारे खात असतात आणि तिथेच कचराही करत असतात. एवढेच नाही तर खाण्याचे डबेही पुढे मागे करत खुले आम खाद्यपदार्थ खाल्ले जात असल्याने नक्की हे महापालिका सभागृह आहे की कोणत्या कार्यक्रमाचे सभागृह आहे असा प्रश्न पडतो. त्यामुळे एकप्रकारे नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांकडून महापालिकेच्या या ऐतिहासिक सभागृहाचे पावित्र्य राखले जात नसून कडक शिस्तीच्या महापौरांकडूनही त्यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना केल्या जात नाही. त्यामुळे खुले आम पाणी पिणे आणि खाणे हा एकमेव प्रकार महापालिका सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ऐतिहासिक सभागृहाचे पावित्र्य राखण्यासाठी जो प्रकार सुरु आहे तो थांबवला जाणार आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment