Sunday, April 19, 2026

Israel vs Arab Country : इस्त्रायल मोठ्या संकटात; १६ मुसलमान देशांची एकजूट

Israel vs Arab Country : इस्त्रायल मोठ्या संकटात; १६ मुसलमान देशांची एकजूट

इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलला मोठा राजनैतिक धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक देशांनी इस्त्रायलच्या भूमिकेविरोधात उघडपणे भूमिका घेतली असून तब्बल १६ देश एकत्र येत कडवा विरोध नोंदवला आहे. शनिवार १८ एप्रिल २०२६ रोजी दोहा येथे इस्लामिक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त निवेदन जारी करत इस्त्रायलच्या निर्णयांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

इस्रायलच्या विरोधात १६ अरब देश : 

इस्रायलच्या विरोधात १६ अरब देशांनी एक संयुक्त निवेदन काढून इस्रायलने सोमालीलँडला सार्वभौम राष्ट्र म्हणून दिलेल्या मान्यतेचा निषेध केला आहे. ही राजनैतिक कारवाई एप्रिल २०२६ मध्ये झाली असून, या देशांनी इस्रायलच्या या कृतीला सोमालियाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हटले आहे.

या १६ मुसलमान देशांची एकजूट :

अल्जेरिया , कोमोरोस , जिबूती , इजिप्त , जॉर्डन , कुवेत , लेबनॉन , लिबिया , मॉरिटानिया , ओमान , पॅलेस्टाईन , कतार , सौदी अरेबिया , सोमालिया , सुदान आणि येमेन.

सोमालियामध्ये इस्त्रायलच्या राजदूत नियुक्तीला अवैध ठरवत, ही एकतर्फी कारवाई असल्याचे मुस्लिम देशांनी म्हटले. आंतरराष्ट्रीय समुदायाने सोमालियाच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक तणाव वाढला असून या पार्श्वभूमीवर इस्त्रायलची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >