वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर दबाव वाढवला आहे. विशेष म्हणजे, या कायद्याच्या समर्थनार्थ ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक व्यवस्थेचा आणि मतदार ओळखपत्राच्या नियमांचा दाखला दिला आहे.
ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतातील मागील लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करताना सांगितले की, भारतात सुमारे ६४.६ कोटी मतदारांनी मतदान केले आणि एक टक्क्यापेक्षा कमी मतदान पोस्टल बॅलेटद्वारे झाले. तसेच प्रत्येक मतदाराकडे वैध फोटो ओळखपत्र असल्याचा दावा त्यांनी केला.
तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक सुरू होणार नसल्याचे इराणने जाहीर केले ...
नक्की काय आहे SAVE America Act ?
व्हाईट हाऊसकडून (White House) मिळालेल्या माहितीनुसार SAVE America Act चा उद्देश अमेरिकेतील फेडरल निवडणुकांमध्ये केवळ अमेरिकन नागरिकांनाच मतदानाचा अधिकार मिळावा हा आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार फेडरल निवडणुकीत मतदानासाठी नोंदणी करण्यापूर्वी मतदारांना वैध ओळखपत्र आणि नागरिकत्वाचा पुरावा सादर करावा लागू शकतो. तसेच मेल-इन मतदानावरही काही निर्बंध आणण्याचा प्रस्ताव आहे. (Donald Trump)
आजारपण, अपंगत्व, लष्करी सेवा किंवा प्रवास अशा विशिष्ट परिस्थितींमध्येच मेल-इन बॅलेटचा वापर करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. याशिवाय, मतदार यादीतून गैर-अमेरिकन नागरिकांची नावे हटविण्याची प्रक्रिया राज्यांना करण्यास सांगितले जाऊ शकते.
इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिकेच्या लष्कराला मोठे आर्थिक आणि सामरिक नुकसान सहन करावे लागत आहे. ...
भारत आणि ब्राझीलच्या निवडणूक व्यवस्थेची अमेरिकेशी तुलना :
व्हाइट हाऊसने भारत आणि ब्राझीलच्या निवडणूक व्यवस्थेचाही उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमध्ये मतदार ओळख व्यवस्थेला बायोमेट्रिक डेटाबेसशी जोडले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्याच्या तुलनेत अमेरिकेत नागरिकत्वाबाबत मोठ्या प्रमाणात self-attestation वर अवलंबून राहिले जाते, असा व्हाइट हाऊसचा युक्तिवाद आहे. (Donald Trump)
SAVE America Act साठीचे विधेयक 29 जानेवारी रोजी सादर करण्यात आले होते. आता हे विधेयक मंजूर करण्यासाठी ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेचा दाखला देत पुन्हा जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, या कायद्यामुळे अमेरिकेतील मतदान प्रक्रिया, मतदार ओळख आणि नागरिकत्वाच्या पुराव्याबाबत राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (Donald Trump)





