Thursday, April 23, 2026

Lenskart clarifies controversy : टिकली अन् टिळ्याच्या वादावर लेंस्कार्टचे स्पष्टीकरण; ‘ती जुनी ट्रेनिंग फाइल, अधिकृत पॉलिसी नाही’

Lenskart clarifies controversy : टिकली अन् टिळ्याच्या वादावर लेंस्कार्टचे स्पष्टीकरण; ‘ती जुनी ट्रेनिंग फाइल, अधिकृत पॉलिसी नाही’

- पीयूष बन्सल यांनी मागितली माफी

मुंबई : लेंस्कार्टचे (Lenskart) संस्थापक आणि सीईओ पीयूष बंसल यांनी सोशल मीडियावर सुरु असलेल्या वादावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हा दस्तावेज कंपनीची अधिकृत एचआर पॉलिसी नसून एक जुनी अंतर्गत ट्रेनिंग फाइल होती, जी चुकीच्या संदर्भात शेअर करण्यात आली आहे.

बंसल यांनी मान्य केले की त्या फाइलमध्ये बिंदी आणि तिलक संदर्भात एक अयोग्य ओळ समाविष्ट होती. मात्र, ही चूक १७ फेब्रुवारीलाच लक्षात येऊन ती दुरुस्त करण्यात आली होती. संबंधित मजकूर हटवण्यात आला होता, म्हणजेच हा मुद्दा सार्वजनिक होण्याच्या काही आठवडे आधीच कंपनीने आवश्यक कारवाई केली होती.

या प्रकरणात ही त्रुटी आधी लक्षात न आल्याची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली. “ही चूक आमच्या लक्षात यायला हवी होती,” असे सांगत त्यांनी पारदर्शक भूमिका मांडली.

तसेच, लेंस्कार्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक प्रतीकांचा आदर केला जातो, असेही त्यांनी अधोरेखित केले. कंपनीच्या संस्कृतीत विविधतेला महत्त्व असून प्रत्येक कर्मचाऱ्याची ओळख जपणे हीच लेंस्कार्टची भूमिका असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा