Thursday, April 16, 2026

Nashik MNC Forced Conversion Case : महिलांचा छळ आणि धर्मांतर प्रकरणात ७ जण अटकेत; मुख्य सूत्रधार निदा खान फरार

Nashik MNC Forced Conversion Case : महिलांचा छळ आणि धर्मांतर प्रकरणात ७ जण अटकेत; मुख्य सूत्रधार निदा खान फरार

नाशिक : नाशिकमधील एका नामांकित कंपनीत महिला छळवणूक आणि धर्मांतराशी संबंधित गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी नाशिक येथील मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाची मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेली २६ वर्षीय निदा खान (Nida Khan) मात्र गेल्या २० दिवसांपासून फरार आहे.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीत मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम करणारी निदा खान ही महिलांना टार्गेट करून त्यांची मानसिक छळवणूक आणि धर्मांतरासाठी दबाव टाकण्यामागे प्रमुख भूमिका बजावत होती. रोजच्या मीटिंग्स आणि कामाच्या नियोजनाच्या माध्यमातून हिंदू मुलींना त्रास देणे आणि त्यांच्यावर दबाव टाकणे हे नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणले जात असल्याचा धक्कादायक उलगडा झाला आहे.

या प्रकरणात कंपनीची एचआर अश्विनी चैनानी (HR Ashwini Chainani) हिला अटक करण्यात आली असून तिच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. सहा पुरुष आणि दोन महिला आरोपींच्या सहभागातून हा प्रकार व्हॉट्सॲप (WhatsApp) ग्रुपच्या माध्यमातून चालवला जात असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, निदा खानच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली असून तिचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. तपास यंत्रणेला या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.

निदा खानची अटक या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची कडी मानली जात असून तिच्या चौकशीतून या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड आणि संभाव्य नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >