नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्या महिलांना फसवणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण सुरु असतानाच नाशिकच्या आयटी कंपनीतून धक्कादायक गोष्ट समोर आली, नावाजलेल्या आयटी कंपनीत मांडलेला धर्मांतराचा खेळ, नाशिकच्या महिला पोलिसांनी हाणून पाडला आणि समोर आल्या अनेक धक्कादायक गोष्टी
हे मिशन नक्की ठरल तरी कस?
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश मुंबई : नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा घरकुल फसवणूक ...
महिलांचा छळ
महिलांना काम संपल्यानंतरही ऑफिसमध्ये थांबवून कंपनीचे काम आहे हे ते करावंच लागेल असं भासवून संशयास्पद प्रकार करत असल्याचे महिला पोलिसांच्या लक्षात आले. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणींना लक्ष करून आपल्या जाळयात ओढण्याचे काम , त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार, आर्थिक छळ, तसेच जबरदस्तीने धर्म स्वीकारण्यास भाग पाडला जात होता. पथकाने प्रत्यक्ष कंपनीत वावरत असताना संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवत, मिटींग्स दरम्यान होणारे अश्लील हावभाव आणि गैरवर्तन पोलिसांनी पहिले होते. कंपनीच्या मालमत्तेचा वापर करत व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक प्लॅन्स आणि ऑपरेशन्स तयार करून कंपनीत ते राबवले जायचे.
नाशिक पोलिसांनी या प्रकारांचा छडा लावण्यासाठी या प्रकरणाच्या खोलात शिरण्यासाठी वेषांतर करून, कंपनीत वावरताना अनके पुरावे जमा केले. जवळपास ४० हुन अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासत ठोस पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी नाशिकमध्ये ९ गुन्हे दाखल झाले असून आता SIT कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे.






