मुंबई : कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय रियालिटी शो 'बिग बॉस मराठी सीझन ६' ( Bigg Boss Marathi Season 6) आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. जसजसा ग्रँड फिनाले जवळ येत आहे, तसतसा घरातील खेळाला वेग आला असून स्पर्धकांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. गेल्या काही दिवसांत अनपेक्षित एलिमिनेशनमुळे प्रेक्षक आणि घरातील सदस्य दोन्ही हादरले असतानाच, आता सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या 'भाऊचा धक्का' या भागाकडे लागल्या आहेत. गेल्या संपूर्ण आठवड्यात घरामध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः नॉमिनेशन टास्क दरम्यान राकेश आणि विशाल यांच्यात झालेला वाद चर्चेचा विषय ठरला आहे. हा वाद केवळ खेळापुरता मर्यादित न राहता वैयक्तिक पातळीवर पोहोचला, ज्याचे रूपांतर एका मोठ्या खडाजंगीमध्ये झाले. दोघांमधील हाणामारीची परिस्थिती पाहून घरातील इतर सदस्यही चिंतेत पडले होते. या राड्यामुळे बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन झाले असून, आज रितेश देशमुख या प्रकरणावर काय भूमिका घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कलर्स मराठीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख अत्यंत गंभीर अवतारात दिसत आहेत. यावरून असे स्पष्ट होत आहे की, आज राकेश आणि विशाल या दोघांचीही रितेश भाऊंकडून कडक शब्दांत खरडपट्टी काढली जाणार आहे.
Pravin Darekar : जुहू, दहिसर, अंधेरीतील रखडलेला पुनर्विकास मार्गी लागणार
दरेकर अभ्यासगटाच्या आणखी एका शिफारशीची अंमलबजावणी
मुंबई : दरेकर अभ्यासगटाच्या एका महत्वपूर्ण शिफारशीची अंमलबजावणी होतेय, याचा विशेष आनंद आहे. ...
नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांची धाकधूक वाढली
Pravin Darekar : जुहू, दहिसर, अंधेरीतील रखडलेला पुनर्विकास मार्गी लागणार
दरेकर अभ्यासगटाच्या आणखी एका शिफारशीची अंमलबजावणी
मुंबई : दरेकर अभ्यासगटाच्या एका महत्वपूर्ण शिफारशीची अंमलबजावणी होतेय, याचा विशेष आनंद आहे. ...
">कलर्स मराठीने सोशल मीडियावर नुकताच 'भाऊचा धक्का' या विशेष भागाचा प्रोमो प्रदर्शित केला असून, या प्रोमोने इंटरनेटवर खळबळ माजवून दिली आहे. हा आठवडा राडे, एकमेकांचा केलेला पाणउतारा आणि टोकाची वादावादी यामुळे गाजला असून रितेश भाऊ आता कोणाची गय करणार नाहीत, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये आठवडाभरातील काही भयानक वादांच्या क्लिप्स दाखवण्यात आल्या आहेत. यात स्पर्धक एकमेकांच्या अंगावर धावून जाताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. रितेश देशमुख जेव्हा मंचावर एन्ट्री घेतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील गांभीर्य सर्व काही सांगून जाते. "घरातील वातावरण आज गंभीर आहे आणि आता या स्पर्धकांना काही मोठे धक्के देण्याची वेळ आली आहे," अशा शब्दांत रितेश यांनी घरातील सदस्यांना इशारा दिला आहे. यामुळे आजचा 'भाऊचा धक्का' नेहमीच्या मजा-मस्तीपेक्षा जास्त 'सिरियस' आणि कडक असणार असल्याचे प्रेक्षक म्हणत आहेत.
गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना मोठा धक्का बसला, जेव्हा प्रभू शेळके आणि वाईल्ड कार्डद्वारे घरात आलेला संकेत पाठक या दोघांनाही एकाच वेळी घराबाहेर पडावे लागले. या 'डबल एलिमिनेशन'नंतर आता घरातील सदस्यांची संख्या केवळ आठवर येऊन ठेपली आहे. घराबाहेर पडल्यानंतर प्रभू शेळकेने तन्वी कोलते हीच या सीझनची विजेती व्हावी, अशी इच्छा व्यक्त करत घरातील समीकरणे अधिक रंजक केली आहेत. आता पुन्हा एकदा शनिवार-रविवार म्हणजेच 'भाऊचा धक्का' जवळ आला असून, प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे - "आज घरचा रस्ता कोण धरणार?" या आठवड्यात घरात झालेले हाय-व्होल्टेज राडे आणि एकमेकांवर झालेली वैयक्तिक चिखलफेक पाहता, रितेश देशमुख कोणाची कडक शब्दांत शाळा घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.