टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतक

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा पराभव केला. ओमान विरुद्धचा सामना श्रीलंकेने १०५ धावांनी जिंकला. या सामन्यात ओमानच्या मोहम्मद नदीमने ५६ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकार मारत नाबाद ५३ धावा केल्या. हे टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात धीम्या गतीने केलेले अर्धशतक आहे. त्याने ५२ वा चेंडू खेळत अर्धशतक केले.


टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात संथ अर्धशतक करणाऱ्यांच्या यादीत ओमानचा मोहम्मद नदीम दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान पहिल्या तर दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर तिसऱ्या स्थानी आहे.



टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात संथ अर्धशतक करणारे फलंदाज




  • ५२ चेंडूत ५० धावा – मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) विरुद्ध कॅनडा, न्यू यॉर्क, २०२४

  • ५२ चेंडूत ५० धावा – मोहम्मद नदीम (ओमान) विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले, २०२६*

  • ५० चेंडूत ५० धावा – डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध नेदरलॅंड्स, न्यू यॉर्क, २०२४

  • ४९ चेंडूत ५० धावा – डेवॉन स्मिथ (वेस्ट इंडिज) विरुद्ध बांग्लादेश, जोहान्सबर्ग, २००७

  • ४९ चेंडूत ५० धावा – डेविड हसी (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, २०१०

  • ४९ चेंडूत ५० धावा – सूर्यकुमार यादव (भारत) विरुद्ध यूएसए, न्यू यॉर्क, २०२४


ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा विजय


ओमान विरुद्धचा सामना श्रीलंकेने १०५ धावांनी जिंकला. या सामन्यात श्रीलंकेचा पवन रथनायके सामनावीर झाला. त्याने २८ चेंडूत २१४.२९ च्या स्ट्राईक रेटने एक षटकार आणि आठ चौकार मारत ६० धावा केल्या. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे ओमानला भोवले. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने २० षटकांत पाच बाद २२५ धावा केल्या तर ओमानला २० षटकांत ९ बाद १२० धावा करणे जमले.

Comments
Add Comment

Cristiano & Georgina : फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जियाना रॉड्रिगेझ अडकणार लग्नबेडीत; मादेरा येथे रंगणार सोहळा

फुटबॉल जगतातील लोकप्रिय तारा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची पार्टनर, मॉडेल जॉर्जियाना रॉड्रिगेझ यांच्या

IND vs SLA Test Series Sai Sudharsan : साई सुदर्शन सराव सामन्याला मुकणार, पण...; पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिलासा

India vs Sri Lanka Test Series : भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी युवा फलंदाज साई सुदर्शन (Sai Sudharsan) याच्या दुखापतीमुळे चाहत्यांची

Rohit Sharma Selection Controversy : रोहित शर्माच्या निवडीवरून BCCI विरुद्ध निवड समिती? आगरकर कोंडीत; पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे?

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वरिष्ठ खेळाडूंच्या निवडीवरून चर्चांना उधाण आले आहे. रोहित शर्माच्या (Rohit

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Sunil Gavaskar on Ajinkya Rahane : 'अजिंक्य रहाणेला कधीच योग्य श्रेय मिळालं नाही'; रहाणेच्या निवृत्तीनंतर सुनील गावसकर भावुक, राहुल द्रविडशी केली तुलना

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय

Brock Lesnar : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य