Cristiano & Georgina : फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जियाना रॉड्रिगेझ अडकणार लग्नबेडीत; मादेरा येथे रंगणार सोहळा

फुटबॉल जगतातील लोकप्रिय तारा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची पार्टनर, मॉडेल जॉर्जियाना रॉड्रिगेझ यांच्या लग्नाची चर्चा सध्या जगभरात जोरदार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रसिद्ध जोडपे या आठवड्याच्या अखेरीस रोनाल्डोचे जन्मस्थान असलेल्या पोर्तुगालमधील मादेरा बेटावर विवाहबंधनात अडकणार आहे. जरी या जोडप्याने अद्याप अधिकृत पुष्टी केली नसली, तरी ब्रिटिश वृत्तपत्र 'द सन'च्या वृत्तानुसार, बेटाची राजधानी फुनशाल येथील ऐतिहासिक कॅथेड्रल विवाह सोहळ्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.



याआधी नोव्हेंबरमध्ये पोर्तुगीज दैनिक 'जॉर्नल दा मडेरा'नेही रोनाल्डोला आपल्या मायदेशात लग्न करायचे असल्याचे वृत्त दिले होते. विवाहानंतरचा खासगी सोहळा फुनशालमधीलच एका पंचतारांकित 'सवॉय पॅलेस हॉटेल'मध्ये पार पडण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हॉटेलमधील पाहुण्यांना शुक्रवार आणि शनिवारी दोन मजले आणि बारचे काही भाग उपलब्ध नसल्याची माहिती आधीच देण्यात आली आहे. रोनाल्डोसाठी मादेरा हे केवळ लग्नाचे ठिकाण नसून, त्याची फुटबॉल कारकीर्द सुरू होण्यापूर्वी त्याचे बालपण याच फुनशाल शहरात गेले आहे.



रोनाल्डो आणि जॉर्जियाना २०१६ मध्ये माद्रिदमध्ये एका गुच्ची स्टोअरमध्ये भेटले होते. तेव्हापासून हे जोडपे एकत्र राहत असून त्यांनी सुंदर संसार थाटला आहे. दरम्यान, ऑगस्ट २०२५ मध्ये रोनाल्डोने जॉर्जियानाला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर जॉर्जियानाने तिच्या इन्स्टाग्रामवर अंगठीचा फोटो शेअर करत “हो, मी तयार आहे. या जन्मात आणि माझ्या सर्व जन्मांमध्ये,” असे लिहीत आपल्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली होती. आता या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)