ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा विजय, पवन रथनायके सामनावीर

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा पराभव केला. ओमान विरुद्धचा सामना श्रीलंकेने १०५ धावांनी जिंकला. या सामन्यात श्रीलंकेचा पवन रथनायके सामनावीर झाला. त्याने २८ चेंडूत २१४.२९ च्या स्ट्राईक रेटने एक षटकार आणि आठ चौकार मारत ६० धावा केल्या.


नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे ओमानला भोवले. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने २० षटकांत पाच बाद २२५ धावा केल्या तर ओमानला २० षटकांत ९ बाद १२० धावा करणे जमले. ओमानकडून मोहम्मद नदीमने नाबाद ५३ धावा केल्या. वसीम अलीने २७ धावा केल्या. इतर फलंदाज दोन आकडी वैयक्तिक धावा करू शकले नाही. श्रीलंकेकडून महेश थीकशन आणि दुष्मंथा चामीराने प्रत्येकी दोन तर डुनिथ वेलागे, दुषण हेमंथ आणि कमिंडू मेंडिसने प्रत्येकी एक विकेट घेतली.


याआधी श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने ६१, पवन रथनायकेने ६० तर कर्णधार असलेल्या दासुन शनाकाने ५० धावा केल्या. कमिंडू मेंडिसनेने नाबाद १९ आणि पथुम निस्सांकाने १३ धावांचे योगदान दिले. कामिल मिश्राराने ८ धावा केल्या तर डुनिथ वेलागेने नाबाद ६ धावा केल्या. ओमानकडून जितेन रामानंदीने २ तर जय ओडेद्रा आणि सुफियान मेहमूदने प्रत्येकी एक विकेट घेतली.


श्रीलंकेसाठी मोठा विजय


ओमान विरुद्धचा श्रीलंकेचा विजय हा यंदाच्या वर्ल्डकपमधील लंकेचा सर्वात मोठा विजय आहे. श्रीलंकेच्या एकूण टी ट्वेंटी क्रिकेट कारकि‍र्दीचा विचार केल्यास हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय आहे. तसेच ओमानचा हा टी ट्वेंटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव आहे. याआधी त्यांचा पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात ९३ धावांनी पराभव झाला होता.


श्रीलंकेने मोठ्या फरकाने मिळवलेले सर्वोत्तम चार विजय




  • १७२ धावांनी विजय विरुद्ध केनिया, जोबर्ग, २००७ विश्वचषक

  • १०५ धावांनी विजय विरुद्ध ओमान, पल्लेकेले, २०२६ विश्वचषक*

  • ८३ धावांनी विजय विरुद्ध नेदरलँड, ग्रोस आयलेट, २०२४ विश्वचषक

  • ८२ धावांनी विजय विरुद्ध झिम्बाब्वे, हंबनटोटा, २०१२ विश्वचषक

Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला