पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा पराभव केला. ओमान विरुद्धचा सामना श्रीलंकेने १०५ धावांनी जिंकला. या सामन्यात ओमानच्या मोहम्मद नदीमने ५६ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकार मारत नाबाद ५३ धावा केल्या. हे टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात धीम्या गतीने केलेले अर्धशतक आहे. त्याने ५२ वा चेंडू खेळत अर्धशतक केले.
टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात संथ अर्धशतक करणाऱ्यांच्या यादीत ओमानचा मोहम्मद नदीम दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान पहिल्या तर दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर तिसऱ्या स्थानी आहे.
पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा पराभव केला. ओमान विरुद्धचा सामना ...
टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात संथ अर्धशतक करणारे फलंदाज
- ५२ चेंडूत ५० धावा – मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) विरुद्ध कॅनडा, न्यू यॉर्क, २०२४
- ५२ चेंडूत ५० धावा – मोहम्मद नदीम (ओमान) विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले, २०२६*
- ५० चेंडूत ५० धावा – डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध नेदरलॅंड्स, न्यू यॉर्क, २०२४
- ४९ चेंडूत ५० धावा – डेवॉन स्मिथ (वेस्ट इंडिज) विरुद्ध बांग्लादेश, जोहान्सबर्ग, २००७
- ४९ चेंडूत ५० धावा – डेविड हसी (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, २०१०
- ४९ चेंडूत ५० धावा – सूर्यकुमार यादव (भारत) विरुद्ध यूएसए, न्यू यॉर्क, २०२४
ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा विजय
ओमान विरुद्धचा सामना श्रीलंकेने १०५ धावांनी जिंकला. या सामन्यात श्रीलंकेचा पवन रथनायके सामनावीर झाला. त्याने २८ चेंडूत २१४.२९ च्या स्ट्राईक रेटने एक षटकार आणि आठ चौकार मारत ६० धावा केल्या. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे ओमानला भोवले. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने २० षटकांत पाच बाद २२५ धावा केल्या तर ओमानला २० षटकांत ९ बाद १२० धावा करणे जमले.







