भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन महत्त्वपूर्ण दौरा सोमवारी सायंकाळी पार पडला. सायंकाळी ४.३० वाजता ते दिल्लीतील पालम विमानतळावर दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारून अभिवादन केले व एकाच वाहनातून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.


यानंतर लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी शेख नाहयान आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील नक्षीकाम केलेला लाकडी झुला आणि काश्मिरी पश्मीना शाल चांदीच्या डब्यातून भेट दिली, ज्यातून भारताची हस्तकला व हातमाग परंपरा अधोरेखित झाली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवादविरोधी सहकार्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि गुंतवणूक या मुद्द्यांवर चर्चा झाली. आखातातील भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.


मी माझ्या भावाला घेण्यासाठी आलो होतो :
पंतप्रधान मोदी पंतप्रधान मोदींनी विमानतळावरील स्वागताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना अल नाहयान यांचा उल्लेख 'माझे भाऊ' असा केला. भारत आणि यूएई यांच्यातील अतुट मैत्रीला ते किती महत्त्व देतात, हे त्यांच्या या भेटीवरून स्पष्ट होते. त्यांच्याशी होणाऱ्या चर्चेसाठी मी उत्सुक आहे, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी अरबी भाषेतही पोस्ट लिहून या भेटीचे महत्त्व अधोरेखित केले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :

Indian Army : यावर्षी कर्तव्य पथावर दिसणार हे 'सहा शस्त्र' जी पाकिस्तानसह कोणत्याही शत्रूला भरवतील धडकी

नवी दिल्ली : भारताच्या कर्तव्य पाथ (प्रजासत्ताक दिन परेड) मध्ये यंदा देशाच्या संरक्षण आणि सामर्थ्याचे प्रदर्शन