Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या दौऱ्यात ते हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करणार आहेत. दुपारी सुमारे १.३० वाजता ते एर्नाकुलम येथे पोहोचून सुमारे १०,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना चालना देतील. कार्यक्रमादरम्यान ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.


एर्नाकुलम येथे पंतप्रधान भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या कोची रिफायनरीमध्ये सुमारे ५,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत उभारल्या जाणाऱ्या पॉलीप्रोपिलीन युनिटची पायाभरणी करतील. दरवर्षी ४०० किलो टन क्षमतेच्या या प्रकल्पामुळे देशातील पॉलिमर उत्पादन क्षमता वाढणार असून आयात अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. तसेच उद्योगांना चालना मिळून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.


याच कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्ग-६६ वरील थलापडी–चेंगळा सहा पदरी महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. सुमारे २६५० कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेला हा मार्ग मुंबई–कन्याकुमारी आर्थिक कॉरिडॉरचा महत्त्वाचा भाग असून कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू परिसरातील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. तसेच कोझिकोड बायपासच्या वेंगलम ते रामनट्टुकरा सहा पदरीकरण प्रकल्पाचेही उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात घटण्याची अपेक्षा आहे.





याशिवाय प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत उभारलेल्या २३ ग्रामीण रस्त्यांचे उद्घाटन, अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकसित शोरनूर जंक्शन, कुट्टीपुरम आणि चंगणसेरी रेल्वे स्थानकांचे उद्घाटन तसेच शोरनूर–निलंबूर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पणही पंतप्रधान करणार आहेत. पलक्कड–पोल्लाची दरम्यान नवीन रेल्वे सेवेलाही ते हिरवा झेंडा दाखवतील. तसेच कोल्लम जिल्ह्यातील पश्चिम कल्लाडा येथे ५० मेगावॅट क्षमतेच्या तरंगत्या सौर प्रकल्पाची पायाभरणीही केली जाणार आहे.


यानंतर सायंकाळी ५.४५ वाजता पंतप्रधान तिरुचिरापल्ली येथे सुमारे ५६५० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यात पेट्रोलियम व नैसर्गिक वायू पायाभूत सुविधा, महामार्ग विकास, ग्रामीण रस्ते आणि रेल्वे सेवांचा समावेश आहे. या दौऱ्यात ते नीलगिरी आणि इरोड जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करतील, ज्यामुळे लाखो घरांना पीएनजी कनेक्शन उपलब्ध होणार आहे. तसेच दोन अमृत भारत एक्सप्रेससह अनेक रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवून दक्षिण भारतातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)