काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये थंड हवेची ठिकाण पर्यटकांनी फुलतात. ज्यात महाराष्ट्रातील महाबळेश्वर, माथेरान आणि महाराष्ट्राबाहेर मनाली, काश्मीर या ठिकाणांना पर्यटकांची विशेष पसंती असते. याप्रमाणेच अनेकजण खास काश्मीरमधील गुलमर्गला भेट देतात. मात्र तुम्ही आता गुलमर्गला भेट द्यायचे नियोजन करत असाल तर तुम्ही गुलाबी नव्हे, तर जीवघेण्या थंडीचा अनुभव घ्याव. कारण, गुलमर्गचे तापमान विक्रमी घटले असून पारा उणे २ अंश सेल्सिअसवर घसरला आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर काश्मीर खोऱ्यात ३० डिसेंबरपासून अतिबर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


मागील २४ तासात जम्मू आणि काश्मीरच्या बहुतेक भागांमध्ये हवामान कोरडे होते. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. उत्तर काश्मीरमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट असलेल्या गुलमर्गमध्ये सर्वाधिक थंडी होती. गुलमर्गमध्ये पारा उणे २ अंशावर घसरला असून पहलगाममध्ये किमान तापमान ०.४  अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. श्रीनगर शहरात किमान तापमान ३ अंश सेल्सिअस होते. विशेष म्हणजे हे आतापर्यंतचं विक्रमी कमी तापमान असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या श्रीनगर केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.




काश्मीर खोऱ्यात थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काश्मीर खोऱ्याच्या इतर भागातही रात्री मोठी थंडी जाणवत आहे. यात कुपवाड्यात १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर काझीगुंडमध्ये १.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. जम्मूमध्ये किमान तापमान तुलनेने जास्त होते. जम्मू शहरात ९.१ अंश सेल्सिअस आणि कटरा इथे ९.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. तर आज दुपारपासून खोऱ्यात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. ज्यात झोजिला आणि द्रास परिसरात हलकी बर्फवृष्टी होऊ शकते. ३० ते ३१ डिसेंबरला काश्मीर खोऱ्यात हलकी ते मध्यम बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.मैदानी भागात बर्फवृष्टीची शक्यता कमी असली तरी, रात्री पर्जन्यवृष्टी कायम राहिल्यास काही सखल भागात हलक्या बर्फवृष्टीची शक्यता ४० टक्के आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

Comments
Add Comment

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार

८० हजार कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या

छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापे

रायपूर : भारतमाला प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात झालेल्या अनियमिततांच्या

सुप्रीम कोर्टाची अरावली प्रकरणात स्वतःच्या निर्णयालाच स्थगिती

नवी दिल्ली : अरावली खटल्याची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात पर्वतरांगांच्या नवीन व्याख्येवर