क्रेडिट पॉलिसीनंतर निर्देशांकात तेजी...

डॉ. सर्वेश सुहास सोमण


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची म्हणजेच पाव टक्क्यांची कपात करत तो ५.२५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर नवा रेपो रेट जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेपो रेट ५.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या काही वर्षांतील सर्वात कमी आहे.


रेपो रेट म्हणजे काय?


जेव्हा जेव्हा आरबीआय रेपो रेट कमी करते, तेव्हा कर्जाचे हप्ते घटतात. रेपो रेट म्हणजे असा व्याजदर ज्यावर बँका आरबीआयकडून कर्ज घेतात. स्वतःसाठी कर्ज स्वस्त झाल्यास बँका हा लाभ ग्राहकांपर्यंतही पोहोचवतात. आता रेपो रेटमध्ये कपात झाल्याने, गृहनिर्माण आणि वाहन कर्जांसह किरकोळ कर्जांवरील व्याजदर कमी होण्याची
शक्यता आहे.


रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate)


जेव्हा व्यावसायिक बँकांकडे अतिरिक्त निधी (surplus funds) असतो आणि त्यांना तो सुरक्षितपणे गुंतवायचा असतो, तेव्हा त्या हा निधी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. रिझर्व्ह बँक या निधीवर बँकांना जे व्याज देते, त्या दराला 'रिव्हर्स रेपो दर' म्हणतात.


आरबीआय ने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा महागाईचा अंदाज २.६ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.


पुढील आठवड्याचा विचार करता निर्देशांक निफ्टीची गती आणि दिशा दोन्ही तेजीची असून निफ्टीची २६००० ही महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे तोपर्यंत निर्देशांकातील तेजी टिकून राहील.


मागील आठवड्यात झालेल्या तेजीनंतर पुढील आठवड्यात निफ्टीमध्ये आणखी २०० ते २५० अंकांची तेजी होणे अपेक्षित आहे.


शेअर्सचा विचार करता वोखार्ट फार्मा, नारायण हृदयालय, हिरोमोटो कॉर्प यासह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे.


(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)


samrajyainvestments@gmail.com

Comments
Add Comment

Stock Market Update: अखेरच्या सत्रात शेअर बाजारात तुफान घसरण सेन्सेक्स ६०९.६८ अंकांने व निफ्टी २२५.९० अंकांनी घसरला

मुंबई: सकाळच्या सत्रात शेअर बाजारातील घसरण अखेरच्या सत्रात कायम राहिली आहे. बाजारातील अस्थिरतेचा फटका

महाराष्ट्र शासनाकडून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका ऐतिहासिक समारंभात, महाराष्ट्र सरकार आणि महावितरणने

आता हॉटेलमालक, व्यापारी, आयोजक यांना ग्राहक आधार छायांकित प्रत स्टोअर करता येणार नाही- UIDAI कडून महत्वाचा निर्णय

मुंबई: ग्राहकांच्या सुरक्षेसाठी व पारदर्शकतेची निश्चिती करण्यासाठी आधार कार्ड नोंदणीत नवे मोठे बदल होणार आहेत.

सलग सातव्यांदा इंडिगो शेअर कोसळला मात्र स्पर्धक स्पाईस जेट शेअर्समध्ये जबरदस्त वाढ

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात इंडिगो (IndiGo) कंपनीचा शेअर सलग सातव्या सत्रात घसरल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

नोव्हेंबरमध्ये एकूण रिटेल विक्रीत २.१४% वाढ - FADA, 'ही' ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्वाची माहिती समोर

मोहित सोमण: फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (FADA) संस्थेने नोव्हेंबर महिन्यातील रिटेल गाड्यांच्या विक्रीतील

यावर्षीचा शेवटचा पोको C85 5G उद्या भारतात लाँच होणार

मुंबई: लोकप्रिय ब्रँड पोकोने पोको सी८५ ५जी च्‍या लाँचची घोषणा केली असून उद्यापासून हा स्मार्टफोन बाजारात दाखल