मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर, ‘रेडिओ क्लब जेट्टी डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणार’

मुंबई (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास विभागाच्या माध्यमातून अव्वल कामगिरी करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून नवे अर्थबळ दिले. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या धर्तीवर राज्याची 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' जाहीर करीत दरवर्षी १ हजार २४० कोटींची तरतूद करणार असल्याचे स्पष्ट केले. अशी योजना जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत प्रतिवर्षी १ हजार २४० कोटी रुपये देण्यात येतील. राज्यातील २० हजार ५९४ मासेमारांना याचा लाभ होणार आहे. त्याशिवाय सध्याचे १२५ किमी जलमार्गांचे जाळे ३४० किमीपर्यंत विस्तारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासाठी विद्यमान २१ जलमार्गांवरील २० टर्मिनल्सचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. ११ नवीन जलमार्गांवर २४ नवीन टर्मिनल्स उभारले जातील. त्यासाठी ६ हजार ६०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय मुंबईतील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टी डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.


मरिन शिपयार्ड क्लस्टर विकसित करणार


राज्यात मरिन शिपयार्ड क्लस्टर विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. मासेमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर उभारण्यासह आसपासच्या ४४ गावांत कौशल्य विकासाचे उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई विकसित केली जाईल. लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्र निर्माण करणार आहोत. वाढवण बंदरामुळे १२ लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

Comments
Add Comment

Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात CBI चा मोठा खुलासा! वहिनीला शेवटचा मेसेज अन् अवघ्या काही मिनिटांत...

CBI कडून ६३६ पानांचे आरोपपत्र दाखल मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा (Twisha

Ashok Kharat : 18 गंभीर गुन्ह्यांच्या फेऱ्यात अशोक खरात, 31 ऑगस्टला पुढील सुनावणी

Ashok Kharat : दैवी शक्ती, मंत्र-तंत्र आणि भविष्याची भीती दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण