राज्यात ३०० कोटी झाडे लावणार

मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरणाचे संतुलन राखतानाच राज्याला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने 'हरित महाराष्ट्र' धोरणावर भर दिला आहे. सन २०३५ पर्यंत ६५ टक्के ऊर्जा हरित स्रोतांपासून मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवतानाच, राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम हाती घेण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी आगामी काळात ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
अपेक्षित आहे.


पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असून, आता या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी 'स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप सोलार योजना' मंजूर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शून्य ते १०० युनिट वीज वापरणाऱ्या ५ लाख लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत ६३५ कोटींचे अनुदान दिले जाणार आहे. सद्यस्थितीत राज्यात ४.५७ लाख ग्राहकांनी १ हजार ७३५ मेगावॅट क्षमतेचे सौर संच बसवले असून, ३ हजार २०० कोटी रुपयांचे अनुदान थेट प्राप्त झाले आहे.


ऊर्जा टंचाईवर मात करण्यासाठी ५५ 'उदंचन' प्रकल्पांसाठी करार करण्यात आले आहेत. यातून ७८ हजार २१५ मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट असून, १.२८ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. सध्या ६ प्रकल्पांचे काम सुरू झाले असून, त्यातून १० हजार ३०० मेगावॅट क्षमतेची भर पडणार आहे. २०२९ पर्यंत ५० टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून मिळवण्याचा राज्याचा मानस आहे.


बल्लारपूर येथे ‘टिंबर म्युझियम’


राज्यातील वनसंपत्तीचा आणि विशेषतः सागवान लाकडाचा वारसा जतन करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे ‘टिंबर म्युझियम व झायलॅरियम’ उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून सागवान लाकडाचे संशोधन, जतन आणि जनजागृती केली जाणार आहे.

Comments
Add Comment

Delhi Earthquake : दिल्ली हादरली! पहाटे २.९ तीव्रतेचा भूकंप; अरुणाचल आणि आसाममध्येही जाणवले धक्के

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली रविवारी (२ ऑगस्ट) पहाटे सौम्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. पहाटे ४.१४ वाजता

Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे

Gold News : आता लॉकरमध्ये पडलेल्या सोन्यातून मिळणार नफा! वर्षाला ४% अतिरिक्त सोनं मिळवण्याची नवी योजना; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मुंबई : भारतीय कुटुंबांमध्ये सोन्याला गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानले जाते. अनेकजण भविष्यातील गरज

Maharashtra Freedom of Religion Bill : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, आता आंतरधर्मीय विवाह झाल्यास अपत्याला आईचा धर्म मिळणार

मुंबई : सक्तीने किंवा फसवून केल्या जाणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या

ST BUS : आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास मुंबई : ‘पंढरीची वारी’ (Pandharpur Wari) ही

Commonwealth Games 2026 : ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतानं जिंकली ३९ पदकं, समारोप सोहळ्यात दिसेल अहमदाबाद २०३० ची झलक

ग्लासगो : स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरात सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२६ अर्थात