Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना कार आणि ट्रकच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अशीच एक भीषण दुर्घटना समोर आली आहे. बारामती शहरातील एक दाम्पत्य तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र, दर्शनाहून परत येत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पती अनिल जगताप यांच्यासह कारमधील आणखी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. देवदर्शन करून सुखरूप परतत असताना ही दुर्घटना घडल्याने बारामती शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमी पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.



पती-पत्नीचा अपघाती मृत्यू


बारामतीतील शिवाजी नगर येथील जगताप कुटुंबीयांवर तिरुपती दर्शनाहून परतत असताना नियतीने घाला घातला आहे. शनिवारपासून बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या या कुटुंबातील पती-पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. आज पहाटे ४.३० हुबळी राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. अनिल जगताप यांच्या चारचाकी वाहनाची पुढे जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने जोरदार धडक बसली. या धडकेत अनिल जगताप हे जागीच मृत पावले. त्यांच्यासोबत प्रवास करत असलेल्या वैशाली जगताप या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने हुबळीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. या वाहनात एकूण पाच जण प्रवास करत होते. त्यातील पती-पत्नीसह दोन जण मृत झाले असून, त्यांच्यासोबत असलेली एक मुलगी जखमी झाली आहे, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने उर्वरित दोन जण सुखरूप आहेत. मात्र, या घटनेने जगताप कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, घरातील कर्ता पुरुष आणि गृहिणी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रस्ते महामार्गावरील अपघातांच्या वारंवार घडणाऱ्या घटना पुन्हा एकदा चिंताजनक ठरल्या आहेत. वाहनांचा अतिवेग, ओव्हरटेक करण्याची घाई आणि ड्रँक अँड ड्राईव्ह ही यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.

Comments
Add Comment

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून

महाराष्ट्र 'पद्म'मय, 'पद्मविभूषण'सह १५ पुरस्कारांवर राज्याची मोहोर

धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण , अलका याज्ञिक यांना 'पद्मभूषण'तर रोहित शर्माला 'पद्मश्री' तारपा सम्राट'