Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही अस्थिरता दूर करण्यासाठी 'इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी'ने (IEA) ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत ३२ सदस्य देशांनी आपल्या आपत्कालीन साठ्यातून ४०० दशलक्ष बॅरल कच्चे तेल बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगावर आलेलं तेल संकट काही प्रमाणात दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. ही बाब काही अंशी दिलासा देणारी आहे. सध्या भारतासह जगभरातले अनेक देश तेल संकटात सापडले आहेत.

IEA चे कार्यकारी संचालक फातिह बिरोल यांनी स्पष्ट केले की, सर्व सदस्य देशांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धादरम्यान १८२ दशलक्ष बॅरल तेल अशाच पद्धतीने बाजारात आले होते. मात्र यावेळची आकडेवारी त्याच्या दुप्पट आहे. इराणने 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद केल्याने जागतिक पुरवठ्यावर २० टक्क्यांहून अधिक परिणाम झाला आहे, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. त्याच फायदा तेल संकटाशी सामना करणाऱ्या देशांना होणार आहे.

सध्या तेल बाजारपेठ अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत ३२ देशांनी एकत्र येणे हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक आहे. हा साठा प्रत्येक देश आपल्या सोयीनुसार ठराविक कालमर्यादेत बाजारात उपलब्ध करून देईल. इराणने पुरवठ्याचा मुख्य मार्ग असलेला 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' रोखल्यामुळे जगाची चिंता वाढली होती. जगातील २० टक्के तेलाची वाहतूक याच मार्गावरून होते. मात्र, आता IEA देशांकडे असलेल्या १.२ अब्ज बॅरलच्या साठ्यापैकी मोठा हिस्सा बाहेर काढला जाणार आहे.

"संकटकाळात सर्व देशांनी एकत्र येऊन तोडगा काढणे गरजेचे आहे," असे मत फातिह बिरोल यांनी व्यक्त केले. १९७४ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने आजवरचा सर्वात मोठा तेल पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन बाजारपेठेतील भीती घालवण्याचा प्रयत्न केला आहे. पॅरिसमध्ये मुख्यालय असलेल्या IEA ची स्थापना १९७३ च्या तेल संकटानंतर अशाच परिस्थितीला तोंड देण्यासाठी झाली होती. सध्याच्या परिस्थितीत सदस्य देशांकडे १.२ अब्ज बॅरलचा सार्वजनिक साठा आणि ६०० दशलक्ष बॅरलचा औद्योगिक साठा उपलब्ध आहे. यातून तेलाची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही संस्थेने दिली आहे.
Comments
Add Comment

Supreme Court : चालण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात चालण्याचा हक्क हा संविधानातील मूलभूत अधिकार असल्याचे

Ban on Telegram : टेलिग्रामवरील बंदी २२ जूनपर्यंत कायम

नवी दिल्ली: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म 'टेलिग्राम'ला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. केंद्र

Swiss Bank : स्विस बँकांमधील भारतीयांचा निधी घटला, वैयक्तिक खात्यांतील ठेवींमध्ये वाढ

नवी दिल्ली : स्विस बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या कथित काळ्या धनाबाबत सातत्याने चर्चा होत असताना,

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते PMVBRY लाभ वितरण कार्यक्रम; २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित

नवी दिल्ली : रोजगार निर्मितीला चालना देणे आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र

Narendra Modi : दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाही, भारताने पाकिस्तानला सुनावले

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. भारताने

EPFO : आता एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार पीएफचे पैसे; लवकरच सुविधा होणार सुरू

Navi Delhi : नोकरदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पीएफ (PF) खात्यातील पैसे काढण्यासाठी