जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री एका व्यक्तीने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे हल्लेखोर लगेच पकडला गेला. फारुख अब्दुल्ला सुरक्षित आहे. त्यांना काहीही इजा झाली नाही.


जम्मूत एका लग्न सोहळ्याला फारुख अब्दुल्ला उपस्थित होते. त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील होते. नेमका त्याचवेळी हल्ला झाला. या हल्ल्यात सुरिंदर चौधरी किरकोळ जखमी झाले. घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.


समोर आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये हल्लेखोर कमल सिंग जामवाल मागून येत फारुख अब्दुल्ला यांच्या डोक्यावर बंदूक रोखताना दिसत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब हल्लेखोराला पकडले. त्यावेळी हल्लेखोराने स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी तसेच दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा रक्षकांनी त्याची डाळ शिजू दिली नाही. फारुख अब्दुल्ला यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. हल्लेखोराला अटक करण्यात आली. या प्रकरणी तपास सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि फारुख अब्दुल्लांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.




Comments
Add Comment

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Mark Zuckerberg : पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ काढणं मेटाला महागात पडणार? मार्क झुकरबर्गना संसदीय समितीचा ३ दिवसांचा अल्टिमेटम; “माफी मागा अन्यथा…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक महत्त्वाचा व्हिडिओ काही तासांसाठी फेसबुकवरून (Facebook)