मुंबई : देशभरात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election) प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि सतत घडणाऱ्या राजकीय घटनांमुळे या निवडणुकीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या समोर येत असलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बिहारमध्ये एनडीए आघाडी मिळवू शकते, असे चित्र दिसत आहे. या निकालांचा प्रभाव केवळ बिहारपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणावरही जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. त्यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना प्रचंड वेग आला आहे. आगामी घडामोडींवर यामुळे नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुप्रिया सुळेंनी गाठला वर्षा बंगला
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर अचानक भेट दिल्याने राजकीय वर्तुळात तात्काळ चर्चांना आणि तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, आता या भेटीमागील खरे आणि खासगी कारण समोर आले आहे. सकाळी अचानक झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ही भेट राजकीय स्वरूपाची नसून, एका घरगुती समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी होती. खासदार सुप्रिया सुळे या युगेंद्र पवार यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यामुळे, ही भेट राजकीय स्वरूपाची नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सामाजिक संबंध जपत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लग्नाचे निमंत्रण दिल्याचे या भेटीतून दिसून येते.
"मतांचे विभाजन का झाले, याचा अभ्यास हवा" : सुप्रिया सुळें
खासदार सुळे यांनी बिहारमधील निकालांकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली. निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विश्लेषण करण्याची गरज सांगितली, "बिहारमध्ये नेमकं काय झालं आहे, हे आम्ही पाहिलं पाहिजे. निकालाचा पूर्ण उलघडा (Analysis) केला पाहिजे." सुप्रिया सुळे यांनी यावेळी निवडणुकी दरम्यानच्या अनेक घटकांचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. "आमचा प्रचार, मतदारांपर्यंत पोहोचलेले म्हणणे आणि इतर अनेक बाबी तपासल्या पाहिजेत," असे मत त्यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या की, "पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये आमच्या मतांचं विभाजन का झालं, याबाबत माहिती कळून येईल." खासदार सुळे यांच्या या विधानावरून, बिहारमधील निवडणुकीतील अपयशाची कारणे शोधून पुढील निवडणुकांसाठी योग्य रणनीती आखण्याची तयारी विरोधकांनी सुरू केल्याचे स्पष्ट होते.
पटणा : बिहार निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे की एनडीएने राज्यात प्रचंड बहुमत मिळवून सत्ता पुन्हा मिळवली आहे. या निकालानंतर, नितीश कुमार ...
तातडीने ‘सुरक्षा ऑडीट’ होण्याची गरज
पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावर नुकत्याच झालेल्या भीषण अपघातावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघाताबाबत मत व्यक्त करताना त्यांनी अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. खासदार सुळे यांनी या अपघाताला अतिशय दुर्दैवी म्हटले आहे. "या घटनेत काही नागरिक मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले. यापूर्वीही येथे झालेल्या अपघातांमध्ये जीवितहानी झाली आहे," असे सांगत त्यांनी या मार्गाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. जीवितहानी रोखण्यासाठी नऱ्हे ते रावेत या मंजूर असलेल्या एलिव्हेटेड मार्गासह इतर एलिव्हेटेड मार्गांचे काम तातडीने सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासोबतच, रस्ते सुरक्षेबाबत सातत्याने जनजागृती करण्याची तसेच शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांचे तातडीने 'सुरक्षा ऑडिट' (Safety Audit) होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे: "माझी नितीनजी गडकरी यांना नम्र विनंती आहे की, कृपया आपण नऱ्हे ते रावेत दरम्यानच्या एलिव्हेटेड मार्गाचे काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्या. यासह रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मोहिम हाती घ्यावी." वारंवार होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी सरकारने कठोर पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.