महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या नोंदणीला अभिनेता पद्मश्री अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथून मंगळवारपासून सुरुवात झाली.


आमदार अमित साटम, उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेता गणेश खणकर, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यासह महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर आदी यावेळी उपस्थित होते.


दरम्यान, या स्पर्धेसाठी मंगळवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. नागरिकांना किंवा आस्थापनांना https://sba.mcgm.gov.in/bmc/ या लिंकवर जाऊन किंवा समाजमाध्यम, प्रसारमाध्यमे, जनजागृती फलकांद्वारे प्रसारित करण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन करुन स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल. निकोप आणि पारदर्शकपणे स्पर्धा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक नोंदणीकृत आस्थापनांचे मूल्यमापन संकेतस्थळावर वास्तविक वेळेत (रिअल टाइम) पाहता येईल, असेही गगराणी सांगितले.


मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने निरनिराळ्या उपाययोजना केल्या जात आहेत तसेच विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छ प्रशासकीय विभाग (नगरसेवक गट), स्वच्छ प्रशासकीय विभाग (वॉर्ड), स्वच्छ निवासी संकुल, स्वच्छ झोपडपट्टी परिसर, स्वच्छ वाणिज्यिक आस्थापना, स्वच्छ रुग्णालय (शासकीय व खासगी), स्वच्छ उपाहारगृह (रेस्टॉरंट), स्वच्छ सामुदायिक शौचालय, स्वच्छ रस्ते/मार्ग, स्वच्छ उद्यान आणि मोकळ्या जागा, स्वच्छ बाजार परिसर तसेच आसपासचा परिसर स्वच्छतेसाठी दत्तक घेणे या विविध गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.


स्वच्छ प्रशासकीय विभाग (नगरसेवक गट) गटात प्रथम १ कोटी रुपये, द्वितीय ७५ लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५० लाख रुपये तसेच स्वच्छ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) गटात प्रथम ५० लाख रुपये, द्वितीय २५ लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १५ लाख रुपयांचा पारितोषिक निधी देण्यात येईल. स्वच्छ निवासी संकुल गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ झोपडपट्टी परिसर गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ वाणिज्यिक आस्थापना गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ रुग्णालय (शासकीय व खासगी) गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ शाळा (शासकीय व खासगी) गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ उपाहारगृह गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ सामुदायिक शौचालय गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ रस्ता/मार्ग गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ उद्यान आणि मोकळ्या जागा गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ बाजारपेठ परिसर गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये पारितोषिक राहील. तर, आसपासचा परिसर स्वच्छतेसाठी दत्तक घेणे या विशेष गटासाठी प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये पारितोषिक राहील. या संपूर्ण स्पर्धेचे मूल्यमापन त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणार



सार्वजनिक स्वच्छता हे सामाजिक कर्तव्य-अक्षय कुमार


मुंबई हे महानगर कोट्यवधी नागरिकांना आपल्यामध्ये सामावून घेते. त्यामुळे, या महानगराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी ही येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासन स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न करते. मात्र, केवळ प्रशासनाचे प्रयत्न पुरेसे नाहीत. नागरिकांनी स्वत: पुढाकार घेणे गरजेचे आहे. कारण, सार्वजनिक स्वच्छता हे सामाजिक कर्तव्य आहे, असे आवाहन अभिनेता पद्मश्री अक्षय कुमार यांनी केले आहे. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका निरंतर प्रयत्न करते. नागरिक म्हणून याबाबत आपण अधिक सकारात्मक राहून यात सक्रियपणे सहभागी व्हायला हवे. सार्वजनिक स्वच्छतेमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी, त्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी ‘मुंबई क्लीन लीग’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात विविध आस्थापनांसोबत चित्रपट, क्रीडा आदी क्षेत्रातील वलयांकित व्यक्ती (सेलिब्रिटी) सहभागी होतील. यामुळे, स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन पर्यायाने स्वच्छता राखण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Chinchpokli-cha Chintamani : यंदाच्या गणेशोत्सवात लालबाग-परळ होणार ‘तिरूपती’मय; ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा थाटात संपन्न

मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातील मानाचे पान असलेल्या लालबाग-परळ भागातील ‘चिंचपोकळीचा

Vakola River Waste Prevention : ज्ञानेश्वर नगर लगतच्या वाकोला नदीकाठी बसवणार जाळ्या

- नदीत जाणारा कचरा आता थेट रोखला जाणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) ज्ञानेश्वर नगर झोपडप‌ट्टीतील रहिवाशांकडून वाकोला

Ganeshotsav Devotee Insurance : सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यास भाविकांना विमा कवच

- राज्य शासनामार्फत विमा काढण्याची उबाठा नगरसेवकाची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत गणेशोत्सव

Powai Garden Redevelopment : पवईतील अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन उद्याने टाकणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पवईतील अटलबिहारी वाजपेयी उद्यान आणि पवईतील प्रमोद महाजन वन उद्यानाचे सुशोभीकरण

Maharashtra Weather Alert : ऑगस्टअखेर पावसाची उघडीप; मात्र ‘या’ जिल्ह्यांत जोरदार सरींचा अंदाज, २४ तासांसाठी यलो अलर्ट

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याचं चित्र आहे. बहुतांश भागांत अपेक्षित पाऊस न

Ritu Tawde : कर्करोगाच्या असह्य वेदनांवर प्रेमाची आणि विश्वासाची फुंकर

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे चिमुकल्यांसमवेत रक्षाबंधन रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊसमध्ये साजरा झाला अनोखा