केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त
कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेत तीव्र प्रदूषण निर्माण झाले आहे. कल्याण-डोंबिवली शहरात देखील नागरिकांनी मोठ्या उत्साहात फटाक्यांची केल्या आतषबाजीमुळे हवा प्रदूषणात वाढ झाल्याने वाढत्या प्रदूषणाने नागरिकांना श्वसनाच्या आजाराची लागण झाली घसा खवखवणे, खोकला तसेच सर्दी आदी साथीचे आजाराने नागरिक बेजार झाले आहेत, तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली शहर हवा प्रदूषणामुळे 'अस्वच्छ' श्रेणीत पोहोचली असून शहरातील वायू गुणवत्तेचा निर्देशांक तब्बल २५० (एक्यूआय) इतका नोंदवला गेला आहे.
दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्याच्या आतषबाजीमुळे फटाक्याचा पसरणारा धुरामुळे गेल्या काही दिवसांपासून हवा प्रदूषणात वाढ झाल्याने हवा गुणवत्तेमध्ये घसरण झाली. शांत वाऱ्यामुळे आणि हवेचा प्रवाह मंद असल्याने फटाक्यांचा व वाहनांचा धूर वातावरणात अडकून राहिला. परिणामी, सूक्ष्म प्रदूषणकण (पीएम २.५) यांची घनता वाढली आणि हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावली.
आठवडाभरात कल्याणचा एक्यूआय ६४ वरून थेट २४९ वर पोहोचल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. तज्ज्ञांच्या मते ही पातळी 'अस्वच्छ' मानली जाते. हरित फटाके फोडण्याचे आवाहन करूनही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात धूर पसरवणारे फटाके फोडल्याने शहरात श्वसनाच्या आजारात वाढ झाली आहे.
दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली गेल्याने फाटक्याचा धूर हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसना संबंधित श्वसन नलिका, फुप्फुस आणि दम्याचा विकार, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी यासारखे आजार पसरू लागल्याने डॉक्टर मंडळीकडे संबंधित आजारांच्या रुग्णाची उपचारासाठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वीच्या काही दिवसापासून फटाक्याच्या आल्या जाणाऱ्या आतषबाजीमुळे कल्याण-डोंबिवली शहरातील हवेचा एक्यूआयमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली वाढत्या हवेतील प्रदूषणामुळे हवेचा स्तर घसल्याने तज्ज्ञांच्या मते ही पातळी 'अस्वच्छ' मानली जाते.