भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच केलेल्या एक दाव्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे.


पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमध्ये एका तरुणीचे अपहरण केल्याचा दावा केला जात होता, विशेष म्हणजे या मुलीचं लग्न दोन दिवसांवर असताना तिचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. लग्नाची खरेदी करुन ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत घरी जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं, यावेळी तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड देखील टाकण्यात आली असा दावा करण्यात येत होता. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत न्यायालयीन चौकशी ची मागणी केली. नंतर या मुलीचा एक व्हिडीओ समोर आला , ज्या व्हिडीओमध्ये बोलताना या मुलीनं मोठा दावा केला होता. मी सबंधित मुलासोबत माझ्या मर्जीने पळून आले, आमचे प्रेमसंबंध आहेत, असं या मुलीने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर ते दोघेही पोलिसांसमोर हजर झाले. माझे अपहरण झाले नसून आमचे एकमेकांवर प्रेम आहे, मी माझ्या मर्जीने आल्याचे तरुणीने सांगितले होते.


इंदापूर न्यायालयात सुनावणी दरम्यान मुलीची आई देखील कोर्टात उपस्तिथ होती. मला माझी मुलगी द्या... अशी गयवया केली परंतु मुलीने आईकडे न पाहता आपल्या प्रियकराकडे गेली.


याप्रकरणी आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे, मुलगी आईसोबत जाण्यास तयार नसल्याने हिंदुत्ववादी संघटनेनें आक्रमक पवित्र घेतला. संतप्त नागरिकांनी पुणे - सोलापूर - राष्ट्रीय महामार्ग रोखून तीव्र आंदोलन केले. प्रियकराच्या अटकेची मागणी होऊ लागली. भिगवण बंद ची हाक देण्यात आली. गावकऱ्यांनी न्यायालयाला मुलीला सुधारगृहात ठेवण्याची मागणी केली. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर पुन्हा कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी मुलीला कोणाकडे जायचे असा प्रश्न पुन्हा विचारला असता अचानक मुलीने प्रियकराकडे न जाता आईकडे जाण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यामुळे लोक चक्रावून गेले आहेत.

Comments
Add Comment

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’ मुंबई : राज्यातील ड्रोन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी