मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे


मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय भीम-जय मीम’च्या वल्गना करणारे राजकीय पक्ष निवडणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विसरतात आणि केवळ ‘जय मीम’च उरते. संविधानाच्या कुठल्या पानावर महानगरपालिकेत नमाज पठण करण्याची अनुमती आहे, याचे कागद त्यांनी मला दाखवावे, अशा परखड शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी मालेगाव महानगरपालिकेतील नमाजपठणाच्या प्रकारावर जोरदार प्रहार केला. हे धर्मांधांचे ‘जिहाद’चेच रूप आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते विधानभवनात पत्रकारांशी बोलत होते.



तर आम्ही प्रत्येक महानगरपालिकेत भगवद्गीता वाचू :


आमदार नितेश राणे म्हणाले की, महानगरपालिकेत तुम्ही विकास करण्यासाठी निवडून गेला आहात की इस्लामचा प्रसार करण्यासाठी ? नमाज पडण्यासाठी मशिदींना काय टाळी लागली आहेत का ? हे ‘जिहाद’ नाही, तर काय आहे ? जर उद्या आम्ही प्रत्येक महानगरपालिकेत भगवद्गीता वाचायला प्रारंभ केला, तर या ‘हिरव्या सापांनी’ तोंड उघडू नये. तुम्ही नमाज पडला तर चालते; पण हिंदूंनी काही केले की लगेच ‘हिंदू-मुस्लिम वाद’ उकरून काढला जातो.



मदरसे हे केवळ दहशतवादांचे अड्डे :


सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदरशात लहान मुलांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मदरसे हे केवळ दहशतवादांचे अड्डे असून तिथे देशविरोधी कृत्ये घडवली जातात. इस्लामिक राष्ट्रांमध्ये कुणी भगवद्गीता शिकवण्याची अनुमती देईल का ? मग आम्हीच मदरशांचे लाड का करायचे ? मदरशांमध्ये कधी शस्त्रास्त्रे सापडतात, तर कधी मुलांचे शोषण होते. मशिदीत कुराण शिकवा; पण धर्मांधतेचे धडे देणारे स्वतंत्र मदरसे कशाला हवेत ? महाराष्ट्रातील सर्व मदरसे तातडीने बंद करण्यात यावेत, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. मदरशात मुलांना मारहाण करणार्‍या मुल्ला-मौलवी यांना चेतावणी देताना नितेश राणे म्हणाले की, मी त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यांना असा काही धडा शिकवीन की, पुन्हा हात उचलताना ते १० वेळा विचार करतील. हे जिहादी मानसिकतेचे लोक केवळ हिंसाच जाणतात.

Comments
Add Comment

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ