कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक


सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीनिमित्त वारकरी भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या येथील विभागीय कार्यालय प्रशासनाने चांगला निर्णय घेतला आहे. पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनाने सोलापूर-मिरजमिरज-लातूर या मार्गावरून विशेष गाड्या चालवण्याचे घोषित केले आहे.


गुरूवार, 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या काळात रेल्वेच्या 36 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.गाडी क्रमांक 01443 मिरज-लातूर 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी 7 वाजता मिरजहून सुटून ती दुपारी 3:30 वाजता लातूरला पोहोचणार आहे. ती गाडी सकाळी 10:15 वाजता पंढरपूरच्या रेल्वेस्थानकावर येईल. गाडी क्रमांक 01444 ही लातूर-मिरज दररोज दुपारी 4:00 वाजता लातूरहून सुटून याच दिवशी रात्री 11:45 वाजता मिरजला पोहोचणार आहे.


या गाडीचे सकाळी 7:45 वाजता पंढरपूरच्या स्टेशनवर आगमन होईल. गाडी क्रमांक 01442 लातूर-मिरज ही दररोज सकाळी 6 वाजता लातूरच्या स्थानकावरून सुटून ती दुपारी 1:50 वाजता मिरजला पोहोचेल. गाडी क्रमांक 01441 मिरज-लातूर दररोज रात्री 10:00 वाजता मिरजच्या स्थानकावरून सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता लातूरच्या स्थानकावर पोहोचेल. तीच गाडी पुन्हा रात्री 11:50 वाजता पंढरपूरला पोहोचेल.


Comments
Add Comment

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

पैठण : वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून

लोणार सरोवराबाबत चिंतेची बाब; सरोवरात वाढतेय पाण्याची पातळी

बुलढाणा: पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच