नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?


नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २० ऑक्टोबरच्या रात्री नागा अतिरेकी गट NSCN (K-YA) च्या ठिकाणांवर एक मोठा ड्रोन हल्ला झाल्याचे वृत्त आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात भारतविरोधी नागा अतिरेक्यांचा स्वयंघोषीत वरिष्ठ कमांडर पी. आंग माई ठार झाल्याचे वृत्त आहे. अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण म्यानमारमधील प्रसारमाध्यमांनी पी. आंग माई ठार झाल्याचे सांगितले.


ड्रोन स्ट्राईकमध्ये भारतविरोधी नागा अतिरेक्यांची कमांड पोस्ट आणि आजूबाजूच्या अतिरेक्यांच्या निवासी इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. याच हल्ल्यात भारतविरोधी नागा अतिरेक्यांचा स्वयंघोषीत वरिष्ठ कमांडर पी. आंग माई ठार झाल्याचे वृत्त आहे. हल्ला झाल्यापासून कमांड युनिट आणि पी. आंग माई यांच्यातील संपर्क तुटला आहे.


याआधी जुलै २०२५ मध्ये भारत-म्यानमार सीमेवर अतिरेक्यांवर ड्रोन हल्ला झाला होता. उल्फा-आय, एनएससीएन (के) आणि युंग आंग आणि आंग माई गटांच्या अनेक लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. त्या हल्ल्यात नयन असोम, ब्रिगेडियर गणेश असोम आणि कर्नल प्रदीप असोम यांच्यासह तीन वरिष्ठ उल्फा-आय नेते मारले गेले होते. एनएससीएन (के) चे अनेक कमांडर देखील मारले गेले होते.


अचूक ड्रोन हल्ल्यांमुळे अतिरेक्यांच्या कारवाया थंडावल्या आहेत. हे हल्ले गुप्तचर यंत्रणांकडून मिळणारी माहिती तसेच भारत आणि म्यानमार यांच्यातील समन्वय याआधारे भारतीय सुरक्षा यंत्रणाच करत असल्याच्या बातम्या म्यानमारमधील प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. यावर भारताकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.


Comments
Add Comment

West Bengal Election : मतमोजणीसाठी ४३२ निरीक्षक तैनात, उत्तर २४ परगणा येथे सर्वाधिक देखरेख

कोलकाता  : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांची वेळ आता जवळ आली आहे. सोमवारी राज्यातील २९३ जागांवर

Air Force Rescue: शिडी तुटली आणि सुरू झाला १६ तासांचा थरार! रील बनवणाऱ्या मुलांना एअरफोर्सने कसं वाचवलं? अंगावर काटा आणणारी घटना

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे घडलेली ही धक्कादायक आणि थरारक घटना सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

Delhi Judge : दिल्लीत न्यायाधीशाची आत्महत्या, कारण आलं समोर

नवी दिल्ली : सर्वांना न्याय देणारे न्यायायाधीशच मनाने खचले आणिआत्महत्या केली. दिल्लीतील या घटनेमुळे संपूर्ण देश

Delhi AC Blast: दिल्लीतील विवेक विहारमध्ये एसीचा स्फोट; स्फोटामुळे भीषण आग; ९ जणांचा मृत्यू,अनेक जखमी

नवी दिल्ली: दिल्लीतील विवेक विहार परिसरातील चार मजली इमारतीत पहाटे एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत ९

India-Cambodia Bilateral Military : भारत-कंबोडिया द्विपक्षीय लष्करी सराव ‘सिनबॅक्स- II 2026’ साठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना

नवी दिल्ली : भारत-कंबोडिया द्विपक्षीय लष्करी सरावाची दुसरी आवृत्ती ‘सिनबॅक्स-II 2026’ साठी भारतीय लष्कराची एक तुकडी

Madhya Pradesh : म. प्रदेशातील बर्गी क्रूझ शिप दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२ वर

भोपाळ : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात नर्मदा नदी वर बांधलेल्या बर्गी धरणात झालेल्या क्रूझ दुर्घटनेनंतर मदत व