E100 Fuel Nitin Gadkari : "काल रात्री ८ वाजता फाईलवर सही केली"; E100 इंधनाला हिरवा कंदील, नितीन गडकरींची मोठी घोषणा

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेलबाजारात अस्थिरता वाढत असताना भारताने पर्यायी इंधनाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारने १०० टक्के इथेनॉल (E100) इंधनाच्या (E100 Fuel Nitin Gadkari) वापराला मंजुरी दिली असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे.


नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, "मला आनंदाने सांगायचे आहे की, काल (१२ जून) रात्री ८ वाजता मी १०० टक्के इथेनॉल वापरास मंजुरी देणाऱ्या फाईलवर स्वाक्षरी केली. एकेकाळी या संकल्पनेची खिल्ली उडवली जात होती. इथेनॉल प्रकल्पाला अडथळे आणण्यासाठी नकारात्मक प्रचारही झाला. मात्र आज हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू लागले आहे." फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानावर आधारित वाहनांमध्ये E100 इंधनाचा वापर करता येणार आहे. या वाहनांमध्ये शंभर टक्के इथेनॉलवर इंजिन चालवण्याची क्षमता असते. गडकरी यांनी सांगितले की, पुढील दोन महिन्यांत अनेक वाहन उत्पादक कंपन्या पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी वाहने बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. (E100 Fuel Nitin Gadkari)



टोयोटा, सुझुकी, एमजी आणि ह्युंदाई यांसारख्या कंपन्या येत्या दीड ते दोन महिन्यांत इथेनॉलवर आधारित नवीन मॉडेल्स सादर करू शकतात. यामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. (E100 Fuel Nitin Gadkari)


दरम्यान, भारताने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण (ब्लेंडिंग) करण्याचे उद्दिष्ट आधीच साध्य केले आहे. केंद्र सरकारच्या दाव्यानुसार, या उपक्रमामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्चात मोठी बचत झाली असून, देशाचे एक लाख कोटी रुपयांहून अधिक परकीय चलन वाचले आहे. (E100 Fuel Nitin Gadkari)




याच यशाच्या जोरावर सरकारने आता E100 इंधनाला मंजुरी देत पुढचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील अनेक वाहन कंपन्या अशा वाहनांच्या निर्मितीवर काम करत असून, अलीकडेच मारुती सुझुकीने फ्लेक्स फ्युएलवर चालणारे वॅगनआर मॉडेल सादर केले आहे. तसेच हीरो मोटोकॉर्पनेही इथेनॉल-आधारित फ्लेक्स फ्युएल मोटारसायकल विकसित केली आहे. इंधन क्षेत्रातील ही क्रांतिकारक घडामोड भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाची ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. (E100 Fuel Nitin Gadkari)

Comments
Add Comment

Samay Raina : समय रैनाला मोठा दिलासा; दिव्यांगांवरील असंवेदनशील टिप्पणीप्रकरणी सर्व एफआयआर सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली : विनोदी कलाकार समय रैना याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिव्यांग व्यक्तींविषयी

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील वसतिगृहात सहा मुलींना सर्पदंश, NHRC ने घेतली दखल

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रम शाळेच्या वसतिगृहात अनुसूचित जमातीच्या सहा

PM Vishwakarma Scheme : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी ‘विशेष अतिथी’

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला

Gallantry and Service Medal : देशातील पोलीस, अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या १०५७ जणांना पदके जाहीर

नवी दिल्ली : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे औचित्य साधून देशातील पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक, नागरी

Chamoli tunnel tragedy : ७ कामगारांचा मृत्यू; ३ अद्याप बेपत्ता, बचावकार्य युद्धपातळीवर

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात THDCच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान