Indian Army Uniform 2026 : ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम! भारतीय लष्कराच्या गणवेशात मोठे बदल; ‘बंदी जॅकेट’ला मान्यता

भारतीय लष्कराने (Indian Army) वसाहतकालीन परंपरांपासून दूर जात आपल्या गणवेश संहितेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. औपचारिक प्रसंगी अधिकाऱ्यांना आता पारंपरिक भारतीय शैलीतील ‘बंदी जॅकेट’ परिधान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच समारंभीय पाऊच बेल्टचा वापर कमी करण्यात आला असून संचलनादरम्यान पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तलवार बाळगणे ऐच्छिक करण्यात आले आहे. (Indian Army Uniform 2026)


हे सर्व बदल ‘आर्मी युनिफॉर्म्स-२०२६’ या नव्या १७४ पानी नियमावलीत समाविष्ट करण्यात आले आहेत. तब्बल आठ वर्षांनंतर प्रकाशित झालेल्या या नियमावलीत भारतीय ओळख अधिक ठळक करण्यासाठी आणि ब्रिटिशकालीन अवशेष दूर करण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. लष्कराच्या मते, हे बदल भारतीय लष्कराची प्रतिष्ठा, कार्यक्षमता आणि परंपरा जपत आधुनिक भारतीय विचारांशी सुसंगत आहेत. (Indian Army Uniform 2026)


नवीन नियमांनुसार सर्व श्रेणीतील सैनिकांसाठी ‘3B’ नावाचा हिवाळी गणवेश सादर करण्यात आला आहे. या गणवेशात अंगोला शर्ट, बॅटल जॅकेट आणि बेरेटचा समावेश आहे. तसेच टॅटू, बॉडी पियर्सिंग, केशभूषा, मिशा आणि वैयक्तिक देखभालीसंबंधीचे नियमही अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत. (Indian Army Uniform 2026)



औपचारिक पोशाखात बंदगला, लाउंज सूट किंवा फुलबाह्यांचा शर्ट आणि ट्राउझर्ससोबत आता ‘बंदी जॅकेट’ घालण्याची मुभा देण्यात आली आहे. हे जॅकेट साध्या आणि सौम्य रंगाचे असावे तसेच त्यासोबत त्याच रंगातील फॉर्मल ट्राउझर्स आणि बंद फॉर्मल शूज वापरणे आवश्यक असेल.


महिला अधिकाऱ्यांसाठीही पोशाखाचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यांना साध्या रंगाची साडी किंवा कुर्ता-सलवारसोबत सरळ पँट आणि दुपट्टा वापरण्याची परवानगी आहे. मात्र स्लीव्हलेस कुर्ते, पलाझो किंवा सिगारेट पँटसारख्या कॅज्युअल पोशाखांवर बंदी घालण्यात आली आहे. (Indian Army Uniform 2026)


लष्कराने मेस ड्रेस क्रमांक ५ आणि ६ मधून पाऊच बेल्ट काढून टाकले आहेत. हे ड्रेस राष्ट्रपती भवन, राजभवन, पंतप्रधान निवासस्थान किंवा परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या सन्मानार्थ आयोजित शासकीय समारंभांमध्ये वापरले जातात. मात्र काही विशिष्ट रेजिमेंट्स आणि कॉर्प्ससाठी समारंभीय कार्यक्रमांमध्ये पाऊच बेल्ट वापरण्याची मुभा कायम ठेवण्यात आली आहे. (Indian Army Uniform 2026)


नव्या नियमावलीत ‘रॉयल’सारखे ब्रिटिशकालीन शब्दही वगळण्यात आले आहेत. ॲडज्युटंट जनरल लेफ्टनंट जनरल व्ही. पी. एस. कौशिक यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे की, लष्करी गणवेशातील उरलेल्या वसाहतकालीन प्रथा आणि परिभाषा हटवून त्याला आधुनिक भारतीय दृष्टिकोनाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. दरम्यान, सैनिकांसाठी टॅटू आणि बॉडी पियर्सिंगवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. गणवेशात असताना ब्रेसलेट घालण्यास मनाई असून केवळ धार्मिक कारणांसाठी मनगटावर पवित्र धागा बांधण्याची परवानगी आहे. धार्मिक चिन्हे वापरण्यास बंदी असली तरी शीख सैनिकांना त्यातून सूट देण्यात आली आहे. (Indian Army Uniform 2026)



याशिवाय गणवेशात असताना डिओडोरंट आणि परफ्यूम वापरण्यास मनाई करण्यात आली असून आफ्टर-शेव्ह लोशन वापरण्यास परवानगी आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी लिपस्टिक, रंगीत नेलपॉलिश, टिकली आणि नाकातील पिन यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सिंदूर लावण्याची परवानगी असली तरी तो बेरेट किंवा टोपी घातल्यानंतर दिसणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. भारतीय लष्कराच्या या नव्या नियमावलीकडे स्वदेशीकरणाच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. (Indian Army Uniform 2026)

Comments
Add Comment

Chamoli Tunnel Tragedy : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बोगदा दुर्घटना, ७ ठार आणि ३ अद्याप बेपत्ता

चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सात

Road Accident : नैनितालमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्यामुळे २० पर्यटक जखमी

नैनिताल : चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातील दुर्घटनेला २४ तास होण्याआधीच उत्तराखंडमध्ये आणखी एक मोठी

Samay Raina : समय रैनाला मोठा दिलासा; दिव्यांगांवरील असंवेदनशील टिप्पणीप्रकरणी सर्व एफआयआर सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली : विनोदी कलाकार समय रैना याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिव्यांग व्यक्तींविषयी

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील वसतिगृहात सहा मुलींना सर्पदंश, NHRC ने घेतली दखल

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रम शाळेच्या वसतिगृहात अनुसूचित जमातीच्या सहा

PM Vishwakarma Scheme : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी ‘विशेष अतिथी’

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला

Gallantry and Service Medal : देशातील पोलीस, अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या १०५७ जणांना पदके जाहीर

नवी दिल्ली : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे औचित्य साधून देशातील पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक, नागरी