NDA : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एनडीएच्या पहिल्या बॅचमध्ये १४ महिला अधिकारी सज्ज

देहरादून : सर्वोच्च न्यायालयाच्या २०२१ मधील ऐतिहासिक निर्णयामुळे नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये (एनडीए) महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. यानुसार, एनडीएच्या पहिल्या महिला तुकडीतील १४ कॅडेट्सनी कठोर प्रशिक्षण पूर्ण करून आर्मी आणि एअरफोर्समध्ये अधिकारी म्हणून यशस्वीरित्या पदभार स्वीकारला आहे.


सात दशकांहून अधिक काळ फक्त पुरुषांसाठी खुले असलेल्या राष्ट्रीय रक्षा अकादमी (एनडीए) मधून प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या महिला बॅचमधील १४ कॅडेट्स आता लष्कर आणि वायुदलात अधिकारी पदावर सज्ज झाल्या. इंडियन मिलिटरी अकादमी (आयएमए), देहरादून येथे नुकत्याच झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये ९ महिला कॅडेट्सची लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात आली.भारतीय वायुसेना (इंडियन एअर फोर्स) हैदराबाद येथील एअर फोर्स अकादमी (एएफए), डुंडीगल येथे ५ महिला कॅडेट्स फ्लाइंग ऑफिसर म्हणून कमीशन झाल्या. या सर्व महिला अधिकाऱ्यांना थेट परमनंट कमिशन देण्यात आले. विशेष म्हणजे या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना एनडीएच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासूनच कायमस्वरूपी कमिशन मिळाले. त्यांचा प्रवास २०२१ मध्ये सुरू झाला, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महिलांसाठी एनडीएचे दरवाजे उघडले गेले. यापूर्वी लष्कर आणि वायुदलात महिला अधिकारी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) द्वारे प्रवेश करत असत. एनडीए-आयएमए आणि एनडीए-एएफए मार्गे येणाऱ्या अधिकाऱ्यांना सुरुवातीपासूनच कायमस्वरूपी कमिशन मिळते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात, एकूण ५१५ जेंटलमन कॅडेट्सनी अंतिम टप्पा पार करून लष्करी जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली. आयएमएच्या पासिंग आउट परेडमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाहणी केली, तर एअर फोर्स अकादमीच्या परेडला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.



भारतीय लष्कराच्या ड्रेस कोडमध्ये बदल; नवीन युनिफॉर्म श्रेणींचा समावेश


भारतीय लष्कराच्या गणवेश नियमावलीत सुधारणा करण्यात आले असून विविध प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या गणवेशामध्ये काही नवीन ड्रेस जोडण्यात आले. समारंभीय हिवाळी गणवेशमध्ये आता जवान आणि अधिकाऱ्यांसाठी एकच समान ड्रेस असणार आहे. अधिकाऱ्यांसाठी नवीन विंटर जॅकेटही युनिफॉर्ममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नव्या नियमांनुसार अधिकाऱ्यांसाठी नवीन हिवाळी जॅकेटचा समावेश करण्यात आला असून “३बी” नावाचा नवीन हिवाळी गणवेश प्रकार लागू करण्यात आला आहे. या गणवेशात आधुनिक हिवाळी जॅकेटचा समावेश आहे. हे जॅकेट सध्या भारतीय हवाई दल आणि नौदलात वापरले जात होते आणि आता ते लष्करातही समाविष्ट करण्यात आले आहे. हा गणवेश प्रामुख्याने शांतताकालीन तळांवर वापरला जाणार आहे, कारण प्रत्यक्ष क्षेत्रीय तळांवर सामान्यतः लढाऊ गणवेशच वापरला जातो. लढाऊ गणवेशातही बदल करण्यात आले असून “७ए” नावाचा नवीन प्रकार जोडण्यात आला आहे, ज्यामध्ये टी-शर्टचा समावेश असेल. तसेच “७बी” हा हिवाळी लढाऊ जॅकेट असलेला गणवेश प्रकारही नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या हिवाळी समारंभीय गणवेशात “१सी” हा नवीन प्रकार जोडण्यात आला आहे. हा गणवेश यापूर्वी सैनिक आणि कनिष्ठ आयोगित अधिकारी (जेसीओ) यांच्यासाठी मर्यादित होता, मात्र आता तो अधिकाऱ्यांसाठीही लागू करण्यात आला आहे. याआधी गणवेशांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता पुन्हा विविध प्रकारचे गणवेश समाविष्ट केल्याने त्या निर्णयाच्या उपयुक्ततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून