नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी अचानक धाड टाकली. यादरम्यान केलेल्या झाडाझडतीमध्ये एका अधिकाऱ्याच्या टेबलमधून लपवून ठेवलेली रोकड हस्तगत करण्यात आली, ज्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली.


नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींमध्ये नोंदणी प्रक्रियेसाठी पाच ते आठ हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याचे सांगण्यात येत होते. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान मंत्री बावनकुळे यांनी कार्यालयातील विविध फायली तपासल्या आणि प्रक्रियेमध्ये होत असलेला गैरप्रकार उघडकीस आणला.


?si=UDi53zfHqm_WRJJs

यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, "डिजिटल यंत्रणा असतानाही लाचखोरी सुरू असल्याचे दिसत आहे. हे अत्यंत गंभीर असून यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणीही सामान्य नागरिकांना त्रास देत असेल, तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही."


छाप्याच्या वेळी उपस्थित पोलिसांना त्यांनी लगेचच तपास सुरू करण्याचे निर्देश दिले असून, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.


दरम्यान, महसूल विभागात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने अलीकडेच अनेक डिजिटल सुविधा लागू केल्या आहेत, जसे की ई-स्टॅम्पिंग, ई-बॉन्ड, ई-सिग्नेचर आणि ऑनलाइन पेमेंट. महाराष्ट्र हे या सुविधांची अंमलबजावणी करणारे देशातील १७वे राज्य ठरले आहे.


या डिजिटल सुधारणांमुळे नागरिकांना सुलभ सेवा मिळण्यास मदत होईल, तसेच भ्रष्टाचार रोखण्यास मोठा हातभार लागेल, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

विधिमंडळात प्रवेशासाठी पासेसची दीड हजारात विक्री?; चौकशीचे आदेश

नागपूर : नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश देणारे पास दीड हजार रुपयांत विकले जात आहेत,

वर्षभरात राज्यात पापलेटच्या उत्पादनात ३ हजार ५५ मेट्रिक टनांची वाढ

मंत्री नितेश राणेंची माहिती; कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन करूनच मासेमारीला परवानगी मुंबई : राज्यात पापलेट

समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य; मानवी चुका टाळण्यासाठी उपाययोजनांवर भर

नागपूर : राज्याच्या विकासाची भाग्यरेषा ठरलेल्या 'समृद्धी महामार्गा'वर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर

शेतकऱ्यांना ‘बळीराजा रस्ते’ योजनेचा आधार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या शेत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी

इंडिगोची उड्डाणं रद्द, शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान

मुंबई : इंडिगो विमान कंपनीची शेकडो उड्डाणं रद्द झाली. या गोंधळाचा प्रवाशांना फटका बसला. पण फक्त प्रवासीच नाही तर

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या शेत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी