Friday, September 12, 2025

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुधारणांचे फायदे ग्राहकांना देण्यासाठी सीएट लिमिटेडने आज त्यांच्या सर्व प्रकारच्या टायर्सच्या किमती कमी करण्याची घोषणा केली. आपले वितरक तसेच ग्राहकांना 100 टक्के फायदा देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.

जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीत टायर उद्योगाला लागू असलेल्या जीएसटी दरांमध्ये लक्षणीय कपात करण्यास मंजुरी मिळाली. नवीन न्यूमॅटिक टायर्सवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. तर ट्रॅक्टर टायर्स आणि ट्यूबवर कमी केलेला पाच टक्के जीएसटी दर लागू होईल.

सीएट लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अर्णब बॅनर्जी म्हणाले, “टायर क्षेत्रातील कर दरातील सुसुत्रीकरणाचा तर्कसंगत निर्णय वेळेवर घेतल्याबद्दल आम्ही भारत सरकार आणि जीएसटी कौन्सिलचे आभार मानतो. कमी केलेल्या जीएसटी स्लॅबमुळे टायर उद्योग आणि ग्राहक या दोघांचाही चांगलाच फायदा होईल. वेगवेगळ्या प्रकारची वाहने घेणे तसेच असलेल्या वाहनांची देखरेख करणे ग्राहकांना किफायतशीर ठरणार आहे. टायर बदलणे अधिक स्वस्त बनवल्याने रस्ते देखील सुरक्षित होतील. या निर्णयामुळे अधिक शिस्तबद्धतेला चालना मिळेलच, पण त्याचबरोबर या क्षेत्रातील दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल.” नवीन जीएसटी दरांनुसार कमी केलेल्या किमती 22 सप्टेंबर 2025 पासून सीएटच्या सर्व उत्पादनांवर लागू होतील.

Comments
Add Comment