वर्धा : वीज कोसळून एकाचा मृत्यू, सात जण जखमी

  47

विदर्भात मुसळधार पाऊस सुरु असून वर्धा, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. वर्धा जिल्ह्यातील हिरापूर (तळणी) येथे शेतात शनिवारी फवारणी करत असताना शेतात आडोशाला उभ्या असलेल्या झाडावर दुपारी १.३० वीज कोसळल्याने वृषभ कोटगले वय २२ या तरुणाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.

वृषभ कोटगले याने शनिवारी स्वप्नील कोडापे, संजय गोळे आणि विष्णू भोयर यांना सोबत घेऊन शेतात फवारणी केली.

शेतामध्ये काम करत असताना पावसाने हजेरी लावली. यावेळी स्वप्नील, संजय आणि विष्णू या तिघांनी एका झाडाखाली आसरा घेतला तर वृषभ हा जवळच्याच दुसर्‍या झाडाखाली आडोशाला थांबला. यावेळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू असतानाच वृषभ उभा असलेल्या झाडावर वीज कोसळली आणि यात घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान स्वप्नील कोडापे, संजय गोळे आणि विष्णू भोयर हे जखमी झाले. पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
वृषभ कोटगले हा कुटुंबाचा एकमेव आधार होता.

वृषभच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे वृषभच्या खांद्यावर शेती आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असताना कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पश्चात बहीण, आई आणि आजी-आजोबा असा परिवार आहे.
Comments
Add Comment

मुसळधार पावसाचा खेड, दापोली, चिपळूणला फटका

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय

Anna Hazare on Pune Banner: पुण्यातील बॅनरबाजीवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी

पुणे: विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ

निरोप समारंभात गाणे गाणं महागात पडलं, तहसीलदार प्रशांत थोरात यांचे तात्काळ निलंबन

नांदेड: तहसीलदार प्रशांत थोरात नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे कार्यरत होते. गेल्या महिन्यात त्यांची बदली लातूर

गुहागर : चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी १५० गाड्यांचं बुकिंग

गुहागर आगारातून जास्तीत जास्त चाकरमान्यांना एसटी महामंडळाची सेवा दिली जात असून आतापर्यंत परतीच्या

दापोली : मुसळधार पाऊस, खेड-दापोली रस्ता बंद, असोंडमध्ये रस्ता वाहून गेला

दापोली तालुक्यातील वाकवली–उन्हावरे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे

इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करताना 'उरुण' चा समावेश करण्याबाबत जयंत पाटील यांचे राज्यपालांकडे निवेदन

सांगली: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचे नाव 'ईश्वरपूर' करण्याची घोषणा शासनाने