अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर संतापले शशी थरुर, मोदींना सुचवला रामबाण उपाय

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. जर अमेरिकेला भारताचे महत्त्व समजत नसेल आणि त्यांना भारताची गरज वाटत नसेल तर भारतालाही अमेरिकेची आवश्यकता नाही. अमेरिकेच्या अवास्तव टॅरिफ लागू करण्याच्या धोरणाला भारत जशास तसे असे उत्तर देऊ शकतो. भारत पण अमेरिकेवर ५० टक्के टॅरिफ लावू शकतो; असे शशी थरुर म्हणाले.

सध्या भारतात अमेरिकेतून येणाऱ्या अनेक वस्तूंवर साधारण १७ टक्क्यांपर्यंत टॅरिफ अर्थात कर लागू होतो. भारत अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ वाढवू शकतो. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर टॅरिफ वाढवला तर त्या वस्तू अमेरिकेत महाग होईल. याच पद्धतीने भारताने अमेरिकेच्या वस्तूंवर टॅरिफ वाढवला तर अमेरिकेच्या वस्तू भारतात महाग होतील. वाढलेल्या किंमतीमुळे संबंधित मालाल देशांतर्गत बाजारात असलेली मागणी कमी होईल, असे शशी थरुर म्हणाले.

भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार ९० अब्ज डॉलरचा आहे. भारत ज्या वस्तू निर्यात करतो त्यातील अनेक वस्तूंसाठी पर्यायी बाजार शोधायला थोडा वेळ लागेल. पण हे शक्य आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दबावाच्या राजकारणाला बळी न पडण्याचा आणि ठामपणे उभे राहण्याचा भारत सरकारचा निर्णय योग्य आहे. अमेरिका टॅरिफ धोरणाच्या निमित्ताने दबावाचे राजकारण करण्याच्या प्रयत्नात आहे, असे शशी थरुर म्हणाले. त्यांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचे वर्णन दादागिरी आणि अन्याय्यकारक असे केले आहे.
Comments
Add Comment

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील