Maratha Community Meeting Dispute: सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी! नेमकं काय घडलं?

सोलापुर: सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हाणामारीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. बैठकीतील कार्यकर्त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. जन्मजयराजे भोसले यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अक्कलकोटध्ये शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं होतं. या घटनेने सोलापुरातील राजकीय वातवरण तापलं आहे. प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाचे पडसाद मराठा समाजातही उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत राडा झाल्याची घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?


प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोलापुरात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच बैठकीत हा गोंधळ निर्माण झाला. जन्मजयराजे भोसले यांच्या कार्यकर्त्याकडून एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. या हाणामारीच्या घटनेनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली.
Comments
Add Comment

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत