Vande Bharat : कोल्हापूरकरांनो तुमच्यासाठी खुशखबर! कोल्हापूर-मुंबई दरम्यान १५ दिवसांत वंदे भारत ट्रेन धावणार!

कोल्हापूर : पुणे-कोल्हापूर या दरम्यान धावणारी वंदे भारत आता मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, येत्या १५ दिवसांत ती टर्मिनसवरून धावण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.



सध्या कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत ट्रेन सोमवार, गुरुवार आणि शनिवार अशी ३ दिवस धावते. हीच ट्रेन पुण्यापर्यंत धावत असल्याने व्यापारी, प्रवासी, नोकरदार वर्गाची ती मुंबईपर्यंत सोडण्यात यावी, अशी मागणी होत होती. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे सोडण्यात यावी, अशी पुन्हा मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच ती सकाळी मुंबईला सोडण्यात यावी, असेही सांगितले. बियाणी म्हणाले, 'टर्मिनसवरून नवीन वंदे भारत थेट मुंबईपर्यंत धावणार आहे.


खासदार धनंजय महाडिक यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचा परिणाम म्हणून ही रेल्वे मंजूर झाली आहे. लवकरच गाडीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.' त्यामुळे पुढील १५ दिवसांत मुंबई-कोल्हापूर यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत सध्या धावत आहे. तिचे उद्‌घाटन १६ सप्टेंबर २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. ती सोमवार, गुरुवार व शनिवार अशी तीन दिवस धावते. ती मिनी वंदे भारत २.० प्रकारातील असून, तिला एकूण ८ डबे असून तिची प्रवासी क्षमता ५५० इतकी असणार आहे. त्यात एसी चेअर कार व एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार या दोन प्रकारांच्या डब्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी; शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा जाहीर पाठिंबा

मुंबई: राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय