राज ठाकरे लागले कामाला, पक्षात मोठे फेरबदल, ९ जूनला ठाकरेंचा दौरा

पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यात जोरदार तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने पुण्यातील शहर कार्यालयात पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता, ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.


पुणे महानगरपालिकेतील सर्व जागांवर मनसे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे पुणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ९ जून रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत.


त्यांच्या या दौऱ्यात ते सर्व पदाधिकाऱ्यांची पुण्यात एक मोठी बैठक घेणार आहेत. या बैठकीत शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. मनसे पुणे शहरातल्या संघटनेत मोठे फेरबदल करणार असल्याची चर्चा आहे.

Comments
Add Comment

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक