गोरेगाव गोकुळधाममधील इमारतीत उघड्या जागेवर बकऱ्यांची कुर्बानी

स्थानिक रहिवाशांनी घेतली हरकत


मुंबई (खास प्रतिनिधी): बकरी ईद निमित्त बकऱ्यांची कुर्बानी इमारती तथा गृहनिर्माण सोसायटीमध्ये केली जात असल्याने याला आता विरोध होत असून गोरेगाव गोकुळधाम मधील सॅटेलाईट गार्डन दोनमधील डी ३ इमारतीच्या आवारात उघड्या जागेवर कुर्बानी देण्यात येत असल्याने याला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. या इमारतीच्या आवारात अशाप्रकारे उघड्यावर कुर्बानी दिली जात असल्याने याला परवानगी देण्यात येवू नये आणि दिली असल्यास ती रद्द करावी अशाप्रकारची मागणीच स्थानिक माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी रहिवशांच्या शिष्टमंडळासह महापालिका सहायक आयुक्तांची भेट देत केली आहे. त्यामुळे पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त आता यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.



गोरेगाव पूर्वमधील गोकुळधाममधील आरे भास्कर रोडवरील सॅटेलाईट गार्डन फेज टूमधील डी ३ इमारतीच्या आवारात मुस्लिम बांधव बकरी ईद निमित्त बकऱ्यांची कुर्बानी देतात. यासाठी इमारतीच्या आवारात उघड्यावर ही कुर्बांनी दिली जात आहे. यासंदर्भात येथील राज रुद्रम गृहनिर्माण सोसयटीने भाजपाच्या स्थानिक माजी नगरसेविका प्रिती सातम यांना निवेदन देत याठिकाणी दिल्या जाणाऱ्या कुर्बानीला विरोध केला आहे. मुस्लिम धर्मीय आपल्या सणानिमित्त मंडप बांधून अशाप्रकारे धार्मिक पशुवध करत कुर्बानी देत असल्याने एकप्रकारे आसपासच्या परिसरांमध्ये प्रचंड दुर्गंधीचे वातावरण तसेच किळसवाणा प्रकार दिसून येतो. तसेच अशाप्रकारे खुलेआम बकऱ्यांची कुर्बानी दिली जात असल्याने हे दृश्य पाहून लहान मुलांसह इतरांच्या मनात परिणाम होतो. त्यामुळे याठिकाणी उघड्या जागेवर कुर्बानी देण्यास परवानगी दिली असल्यास करावी अशी मागणी केली.


राज रुद्रम सोसायटीच्यावतीने प्राप्त झालेल्या मागणीची दखल घेत प्रिती सातम यांनी या सर्व रहिवाशांच्या शिष्टमंडळास पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त अजय पाटणे यांनी भेट घेतली आणि रहिवाशांच्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी रहिवाशांनी याबाबत प्रशासनासमोर आपली बाजू मांडून कुर्बानीला विरोध का आहे पटवून देण्याच प्रयत्न केला.


याबाबत स्थानिक माजी नगरसेविक प्रिती सातम यांनी माध्यमांशी बोलतांना स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार येथील रहिवाशांच्या शिष्टमंडळाला सोबत सहायक आयुक्तांची भेट घेवून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच याठिकाणी कुर्बानीसाठी परवानगी दिली असल्यास ती रद्द करावी अशाप्रकारची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल