उल्हास नदीच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुराख्यांना मिळाले जीवनदान

कल्याण :कल्याण तालुक्यातील मोहिली गावाजवळ उल्हास नदी वाहते. यावेळी पावसामुळे उल्हास नदीतील पाण्याची पातळी वाढली आणि मोहिली ते गाळेगाव दरम्यान उल्हासनदी पात्रात असलेल्या बेट सदृश्य भागात तीन गुराखी अडकले. उल्हासनदीची पुराच्या पाण्याची वाढती पातळी आणि जीव धोक्यात आल्याने सावल्या वाघे वय ६५, शंकर पाटील वय ५५, देव गायकर वय ६० सर्व राहणारे मोहाली यांची या प्रसंगातून सुटका कशी होणार यासाठी प्रशासन ‘अ’ प्रभागक्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, आप्तकालीन यंत्रणा, कर्मचारी वर्ग, अग्निशमन दलाचे जवान, महसूल विभाग कर्मचारी कल्याण तालुका यांनी बचाव कार्य सुरू केले.



गाळेगाव येथील स्थानिक कोळीबांधव गुरूनाथ पवार, रोहन पवार यांनी उल्हासनदी पात्राच्या पुराच्या पाण्यात धारेवर कुशलरित्या आणि अनुभवीपणे होडी चालवीत बेटापर्यंत जात तीनही गुरख्यांची सुखरूप सुटका करीत सुरक्षित रित्या नदी किनारी आणलेले पाहता उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला.


गुरनाथ पवार, रोहन पवार यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडचे आहे. देवदुत बनत दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून इतरांचा जीव वाचविणे मोठे धाडसाचे देवदुतासारखे काम त्यांनी केल्याचे यानिमित्ताने दिसत आहे. तहसीलदार सचिन शेजाळ यांनी तातडीने गुरूनाथ पवार, रोहन पवार यांच्या कामांची दखल घेत कल्याण तहसीलदार कार्यालयात रोख बक्षीस देत सत्कार, केला आणि त्यांच्या प्ररेणादायी, धाडसी कामाचे
कौतुक केले.

Comments
Add Comment

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून