मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच अपघातांची शक्यता लक्षात घेऊन महापौर डिंपल मेहता यांनी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देत वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.


शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापौर डिंपल मेहता यांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची महापौर दालनात बैठक बोलावून रस्त्यावर अनधिकृत पार्किंग, वार्डन, शाळेतील पार्किंग, सिग्नल यंत्रणा, रिक्षा स्टॅन्ड याबाबत सविस्तर चर्चा केली आणि या समस्येतून मार्ग काढण्यासाठी काही सूचना दिल्या. त्यात प्रामुख्याने दुपारी आणि संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळेत वाहतूक कर्मचारी तैनात करणे, शहरातील प्रमुख चौकात बंद असलेले सिग्नल लवकर चालू करणे अशा सूचना देण्यात आल्या तसेच अनधिकृत रिक्षा स्टॅन्डची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिका इमारतीच्या बाजूला कोंबडी गल्ली येथे अनधिकृतरीत्या उभ्या राहणाऱ्या बस, चारचाकी वाहनांवर चौकशी करून कारवाई करणे, पी. के. रोड येथे दोन शाळा व आरोग्य केंद्र जवळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. सुभाष चंद्र बोस मैदानालगत अनधिकृतरीत्या पार्किंग होणाऱ्या खासगी बस व ट्रक याची चौकशी करून कारवाई करणे, मीरा रोड येथील लतीफ पार्क व स्टार बाजार परिसरात असलेल्या पालिकेच्या वाहनतळाबाबत जनजागृती करणे अशा सूचना महापौर डिंपल मेहता यांनी दिल्या. यावर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी सर्व सूचना आणि निर्देश याचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे.

Comments
Add Comment

Pankaja Munde : अंबरनाथचं मांजर प्रकरण माहिती आहे का ?

अंबरनाथ : अंबरनाथच्या रॉयल फ्लोरा फेज-२ मध्ये २६ जुलैला बाराव्या मजल्यावरून एक मांजर खाली ढकलून दिल्याचा

Ambernath : अंबरनाथमध्ये मांजरीला इमारतीवरून फेकून ठार केल्याचा आरोप; पंकजा मुंडेंची दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना

मुंबई : अंबरनाथ येथील रॉयल फ्लोरा फेज-2 परिसरात मांजरीला इमारतीच्या 12व्या मजल्यावरून खाली फेकून ठार केल्याचा

MHADA Thane : ठाण्यात म्हाडाची घरं आता स्वस्त! ४४ ते ४६ लाखांत मिळणार सदनिका; नव्याने निघणार लॉटरी

ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमती आता कमी होणार आहेत. उपमुख्यमंत्री

Dog bite incident in Kalyan : कल्याणमध्ये एकाच पिसाळलेल्या भटक्या श्वानाचा धुमाकूळ; अवघ्या सात तासांत तब्बल १३० जणांना घेतला चावा

कल्याण : कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसरातील संदीप हाॅटेल भागात रविवारी दुपारपासून एका पिसाळलेल्या

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८

Vinayak Raut : सुनेने केलेल्या कौटुंबिक छळ अन् अंधश्रद्धेच्या आरोपांवर सुनावणी; विनायक राऊतांना कोर्टाकडून अटकपूर्व जामीन

ठाणे : माजी खासदार आणि शिवसेना (UBT) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांना ठाणे सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.