ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून ठाणे जिल्ह्यातील २३ नागरिक सध्या दुबई येथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व नागरिक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते आणि नियोजित वेळेनुसार आज भारतात परतणार होते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा रद्द झाल्याने त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे. अडकलेल्या प्रवाशांमध्ये कल्याण, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील नागरिकांचा समावेश असून २३ जणांपैकी १२ जण ज्येष्ठ नागरिक आहेत. परतीचा प्रवास असल्याने त्यांच्या जवळील आर्थिक तरतूद संपल्याची माहिती समोर येत आहे. हॉटेल खर्च आणि इतर आवश्यक खर्च भागविणे कठीण झाल्याने त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.


हे सर्व नागरिक सध्या दुबईतील ए-१ फहादी स्ट्रीटवरील ‘ग्रँड अॅस्टोरिया’ हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येत आहे. अडकलेल्या रमेश धलपे यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालय यांच्याशी संपर्क साधून सुरक्षित परतीची मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर संदेश व्हायरल झाल्यानंतर शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी संबंधित कुटुंबांची माहिती घेण्यासाठी तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. मात्र, या प्रकरणी नातेवाईकांनी अद्याप तहसील कार्यालय किंवा पोलिस प्रशासनाशी अधिकृत संपर्क साधलेला नसल्याचे समजते.


सध्याच्या घडीला सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले असले, तरी परतीच्या प्रवासाबाबत अनिश्चितता कायम आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणावे, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे