ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध


ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. स्टेशन एरिया डेव्हलपमेन्ट अलाँग द मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडोअर (स्मार्ट) अंतर्गत ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक परिसराचा विकास करणार आहे.


यासाठी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्था (जायका) यांच्या मदतीने यासाठी एमएमआरडीएकडून विकास आराखडा तयार केला जाणार आहे. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत स्थानक परिसरात प्रवाशांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.


मुंबई – अहमदाबाद अंतर केवळ दोन ते अडीच तासात पार करता यावे यासाठी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात अंदाजे ५०८ किमीच्या या मार्गात एकूण १२ स्थानकांचा समावेश आहे. यात बीकेसी, ठाणे, विरार आणि पालघर ही चार स्थानके आहेत.


बुलेट ट्रेन कार्यान्वित झाल्यानंतर स्थानक परिसरात प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यानुसार आता बुलेट ट्रेन स्थानक परिसराच्या एकात्मिक विकासासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर बीकेसी आणि पालघर स्थानक परिसराचाही ठाणे – विरार स्थानकांच्या धर्तीवर विकास करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली.


ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक परिसराचा विकास कसा साधायचा हे ठरविण्यासाठी नुकतीच एमएमआरडीएच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील कार्यालयात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या आणि जायकाच्या अधिकाऱ्यांनी, तज्ज्ञांनी या कार्यशाळेस हजेरी लावली. यावेळी जायका आणि केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मदतीने स्थानक परिसर विकासासाठी विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच हा आराखडा तयार करून स्थानक परिसराचा विकास मार्गी लावला जाणार आहे.

Comments
Add Comment

Thane News : कासारवडवलीतील ७८० मीटर डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा होणार; अण्णा बनसोडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : ठाण्यातील कासारवडवली-मोगरपाडा परिसरातील ७८० मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी चर्चा

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक

Eknath Shinde : गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवा! मनपांना उपमुख्यमंत्र्यांचे आदेश; उत्कृष्ट काम करणाऱ्या पालिकेला बक्षीस

खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांना कामाला लागण्याचे निर्देश पावसाळ्यात तातडीने

Mira Road : स्कूल व्हॅन रस्त्यावरून जात असताना मेट्रोचा स्लॅब कोसळला, आणि...

मिरा रोड : मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मेट्रोशी संबंधित कामं प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच्या कामांमुळे काही

Dombivli Local Train Accident : डोंबिवली लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू; पोस्टमार्टेम रिपोर्टने तपासाला नवे वळण

डोंबिवली : डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

Kalyan Power Cut : कल्याण ते बदलापूर वीजपुरवठा बंद; ‘या’ भागांत सकाळी ६ ते ११ पर्यंत शटडाऊन

कल्याण : कल्याण, डोंबिवली परिसरासह टिटवाळा, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.