Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासूनच म्हणजेच नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निकालांत भाजपने मुसंडी मारत 'नंबर १' चे स्थान पटकावले. केवळ नगरपालिकाच नव्हे, तर राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपने आपला गड राखला असून, येथे महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संपूर्ण निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. महानगरपालिका असो वा जिल्हा परिषदेच्या निवडणुका, भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीने एकत्रितपणे विरोधकांना चारी मुंड्या चीत केले. जिल्हा परिषदांच्या निकालांनी ग्रामीण भागातही महायुतीची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अनेक दिग्गजांनी आणि स्थानिक नेत्यांनी आपला मूळ पक्ष सोडून सत्ताधारी गटात प्रवेश केला. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला बसल्याचे दिसून आले. अनेक बालेकिल्ल्यांमध्ये संघटनात्मक खिंडार पडल्याने ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळवता आले नाही, परिणामी महाविकास आघाडीच्या पदरी निराशा पडली.



डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार


निवडणुकांचे निकाल लागून काही काळ उलटत नाही तोच, डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यातच भगवे वादळ निर्माण करत अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीत ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. यामध्ये केवळ सामान्य कार्यकर्तेच नव्हे, तर पक्षाचे कणा मानले जाणारे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि अनेक शाखा प्रमुखांनी सामूहिकरीत्या शिंदे गटात प्रवेश केला. विधानसभेतील महाविकास आघाडीच्या पराभवानंतर डोंबिवलीत ठाकरे गटाला बसलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यभरात शिवसेना ठाकरे गटातून गळती सुरूच आहे. अनेक निष्ठावान नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गट किंवा भाजपची वाट धरली आहे. डोंबिवलीतील या घडामोडींमुळे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली संघटना वाचवण्याचे आणि हे पक्षांतर रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सतत सुरू असलेली ही पडझड आगामी काळात पक्षासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण