'पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातलगांना ५० लाखांची मदत देणार'

मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. राज्य सरकार या कुटुंबांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या गरजांवरही लक्ष केंद्रित करेल. जगदाळे कुटुंबातील मुलीला सरकारी नोकरी दिली जाई; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. यात डोंबिवलीच्या तीन, पुण्याच्या दोन आणि पनवेलच्या एका नागरिकाचा समावेश होता. या सहा जणांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.



मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पहलगाम हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर राज्यातील सहा मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.



पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले महाराष्ट्रातील सहा जण

  1. अतुल मोने, डोंबिवली

  2. संजय लेले, डोंबिवली

  3. हेमंत जोशी, डोंबिवली

  4. संतोष जगदाळे, पुणे

  5. कौस्तुभ गणबोटे, पुणे

  6. दिलीप देसले, पनवेल

Comments
Add Comment

मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना गोड

आचारसंहितेतून वाट काढली ! मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी

घरोघरी गाठीभेटींवर उमेदवारांचा भर!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या राजकीय तोफा अखेर मंगळवारी

मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज

२५ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यांनतर मतदान आणि

बेरोजगारी लादू इच्छिणाऱ्या ठाकरे बंधूंना घरी बसवा

भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलारांचा घणाघात मुंबई : दोन्ही ठाकरे बंधू गुंतवणूक विरोधी आहेत. रोजगार

हुतात्म्यांवर गोळीबार करणारे काँग्रेसचेच राज्यकर्ते!

ठाकरे गटाला विसर पडलाय; रवींद्र चव्हाणांची टीका मुंबई : संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी दिलेल्या