मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट ‘लेटर ऑफ क्रेडिट’ (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन जणांना ५ वर्षांची सक्तमजुरी सुनावली आहे. या प्रकरणात विजया बँकेचे तत्कालीन वरिष्ठ व्यवस्थापक दामोधर कामत, माधव एंटरप्रायझेसचे मालक निखिल पट आणि एजंट सुरज तायडे दोषी ठरले.
या घोटाळ्याची सुरुवात २०१२ मध्ये झाली होती. कामत यांनी बनावट LC जारी केल्यावर बँक ऑफ इंडिया (BOI)च्या विलेपार्ले शाखेकडून १० कोटी रुपये मंजूर झाले. पाचवे LC देताना संशय आल्याने चौकशी झाली आणि फसवणुकीचा पर्दाफाश झाला.
विशेष न्यायाधीश ए. व्ही. खरकर यांनी १७ एप्रिल रोजी दिलेल्या निकालात कामत यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली दोषी ठरवत १५ लाख दंड ठोठावला. निखिल पट यांना ८ कोटींचा दंड आणि सुरज तायडे यांना ३० लाखांचा दंड सुनावण्यात आला आहे.
या प्रकरणात एक आरोपी मृत असून दोन फरार आहेत. सात आरोपींपैकी एका आरोपीची निर्दोष मुक्तता झाली.
दरम्यान, देशाच्या आर्थिक रचनेवर घात करणाऱ्या पांढरपेशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे कठोर शिक्षा देणे आवश्यक होते, असे न्यायालयाने नमूद केले.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…