Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडाIPL 2025जोफ्रा आर्चरच्या रडीचा डावामुळे क्विंटन डी कॉक शतकापासून वंचित

जोफ्रा आर्चरच्या रडीचा डावामुळे क्विंटन डी कॉक शतकापासून वंचित

सोशल मीडियावर ट्रोल होतोय; मुद्दाम वाईड बॉल टाकल्याचा आरोप

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे. अनेक क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर आर्चरवर टीका करत त्याने क्विंटन डी कॉकचे शतक रोखण्यासाठी कपटी डाव खेळल्याचा आरोप केला आहे.

बुधवारी गुवाहाटीमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या विजयाचे खाते उघडले. कोलकाताने राजस्थान रॉयल्सचा ८ विकेट्सने पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सने हा सामना १५ चेंडू शिल्लक असताना जिंकला. यावेळी केकेआरचा फलंदाज क्विंटन डी कॉकने राजस्थान रॉयल्स विरुद्ध ६१ चेंडूत नाबाद ९७ रन्स केले. क्विंटन डी कॉकने १५९.०१ च्या स्ट्राईक रेटने रन्स केले. यावेळी त्याने त्याच्या खेळीत ८ चौकार आणि ६ सिक्स लगावले. या खेळीसाठी क्विंटन डी कॉकला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारही देण्यात आला.

IPL 2025 : मुंबई इंडियन्सपुढे कमबॅकचे आव्हान!

काय केले जोफ्रा आर्चरने?

कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाच्या १८ व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. ज्यावेळी क्विंटन डी कॉक ८१ रन्स करून त्याच्या तिसऱ्या आयपीएल शतकाच्या जवळ होता. यावेळी जोफ्रा आर्चर केकेआरच्या डावातील १८ वी ओव्हर टाकत होता. क्विंटन डी कॉकला तिसरे आयपीएल शतक पूर्ण करण्यासाठी १९ रन्सची आवश्यकता होती आणि कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती. १८ व्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरच्या पहिल्या दोन चेंडूंवर क्विंटन डी कॉकने एक चौकार आणि एक सिक्स मारला. यानंतर क्विंटन डिकॉकचा स्कोर ९१ झाला. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सला जिंकण्यासाठी ७ रन्सची आवश्यकता होती. क्विंटन डी कॉकला शतक पूर्ण करण्यासाठी ९ रन्सची गरज होती. मात्र यानंतर जोफ्रा आर्चरने जे केले, त्यामुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले. याच ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने पुढचे दोन चेंडू वाईड टाकले आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला फक्त ५ रन्स शिल्लक राहिले.

सोशल मीडियावर चाहत्यांनी केले ट्रोल

पुढच्याच बॉलवर क्विंटन डी कॉकने सिक्स मारला. पण तो ९७ रन्सवर नाबाद राहिला. क्विंटन डी कॉकचे शतक रोखल्यामुळे जोफ्रा आर्चरवर आरोप लावला जात आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून आरोप केला जातोय की, जोफ्रा आर्चरने १८ व्या ओव्हरमध्ये जाणूनबुजून दोन वाईड बॉल टाकले. जेणेकरून क्विंटन डी कॉक त्याचे शतक पूर्ण करू शकला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -