मुंबई इंडियन्सला मिळाला नवा कॅप्टन!

मुंबई : मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना २३ मार्चला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. तसेच अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेली आयपीएल २०२५ सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच सर्व संघांचे कप्तान कोण असणार हे ही ठरलेले आहे, परंतु पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कप्तान कोण असणार यावरून संभ्रम निर्माण झाला असताना एमआयचा पहिल्या सामन्यातील कप्तान कोण यावरून अखेर पडदा हटला आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या नव्हे, तर सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. हार्दिक पांड्यावर बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटसंदर्भात कारवाई केल्यामुळे त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.



नियमित कर्णधार हार्दिक पांड्या अनफिट आहे असे नाही, तर आयपीएलच्या एका नियमामुळे त्याला एका सामन्याची शिक्षा झाली आहे. यामुळे पांड्याच्या जागी रोहित कप्तानी करेल असे चाहत्यांना वाटले होते. परंतु सीएसके विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव हा एमआयचा कप्तान असणार आहे अशी हार्दिक पांड्यानेच घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे पांड्या मागच्या सीझनमधील कर्माची फळे या सिझनमध्ये भोगत आहे. स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी पांड्यावर घालण्यात आली आहे. यामुळे तो हा सामना खेळू शकणार नाही. मात्र मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या सामन्यापासून पांड्या पुन्हा कप्तान पदाची धुरा सांभाळणार आहे.



सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी

पांड्या आणि प्रशिक्षण महेला जयवर्धने यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाला पांड्याने सुर्याचे नाव पुढे केले. सूर्या सध्या भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत, माझ्या अनुपस्थितीत, तो यासाठी योग्य उमेदवार आहे, असे पांड्याने म्हटले आहे. सुर्यकुमार यादवने यापूर्वीही मुंबई इंडियन्सचे कप्तानपद सांभाळलेले आहे. २०२३ मध्ये आयपीएलवेळी सुर्याने कप्तान पद सांभाळले होते. ती मॅच मुंबईने जिंकली होती. तसेच मुंबई इंडियन्ससाठी हा बदल तात्पुरता असला तरी सूर्यकुमार यादवसाठी ही कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे.



एमआय जसप्रीत बुमराहशिवायच मैदानात उतरणार

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'एक से बढकर एक' गोलंदाज आहेत. तसेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२५) स्पर्धेतील १८ व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या टप्पात जसप्रीत बुमराहशिवायच मैदानात उतरणार आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत संघाच्या गोलंदाजीची प्रमुख धुरा ही ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहरवर असेल. मात्र सध्याच्या घडीला क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजाशिवाय मैदानात उतरणं हा संघासाठी एक मोठा धक्काच आहे. त्याची उणीव भरून काढण्याचे मोठे चॅलेंज मुंबई इंडियन्स संघासमोर असणार आहे.

यंदाच्या तसेच इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात करण्याआधी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि संघाचा प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी या जोडीला बुमराहच्या अनुपस्थितीत निर्माण होणारी पोकळी कशी भरून काढणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर जयवर्धने याने ताफ्यात काय सुरुये ते सांगितले आहे. जयवर्धने म्हणाला की, जसप्रीत बुमराह हा सध्या बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. त्याच्यात प्रगती दिसत असून तो लवकरात लवकर संघात सामील होईल, अशी आशा आहे. तो क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणे निश्चितच एक आव्हान असेल. त्याच्या अनुपस्थितीत अन्य खेळाडूसाठी एक संधी निर्माण होईल, असे सांगत त्यांनी बुमराहच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सचा संघ रविवारी २३ मार्चला चेपॉकच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीनं आपल्या मोहिमेची सुरुवात करणार असून जसप्रीत बुमराह पहिल्या काही लढतींना मुकणार आहे. तो संघाच्या ताफ्यात येत नाही तोपर्यंत मुंबई इंडियन्स कोणता पर्याय आजमावणार ते पाहण्याजोगे असेल.

बीसीसीआयचा ओव्हर रेट नियम

पहिल्या उल्लंघनासाठी – १२ लाख रुपयांचा दंड
दुसऱ्या उल्लंघनासाठी – २४ लाख रुपयांचा दंड
तिसऱ्या उल्लंघनासाठी – ३० लाख रुपये दंड आणि एका सामन्याची बंदी
Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या